Google Ad
Editor Choice

राज्यातील १३ महानगरपालिकांचा आरक्षण व सोडत कार्यक्रम २०२२ जाहीर … पुणे, पिंपरी चिंचवडचाही समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : राज्यातील नवी मुंबई , वसई विरार , कल्याण डोंबिवली , कोल्हापूर , ठाणे , उल्हासनगर , नाशिक , पुणे , पिंपरी चिंचवड , सोलापूर , अमरावती , अकोला व नागपूर या १३ महानगरपालिकांचा आरक्षण व सोडत कार्यक्रम २०२२ हा जाहीर करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ३१ मे रोजी आरक्षण सोडत होणार आहे. सोडतीनंतर प्रभागातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Google Ad

त्याप्रमाणे आरक्षण सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक विभागामार्फत येत्या ३१ मे रोजी होणार आहे.

तसेच, १ जून ते ६ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी आहे. हरकती व सूचनांचा विचार करून १६ जून रोजी अंतिम आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!