महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक – २६/०१/२०२६ नवी सांगवी
प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित,द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.सुभेदार मेजर विजयकुमार यादव मा.आमदार शंकर भाऊ जगताप (पी. सी एम सी) मा.अश्विनीताई जगताप हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व इतर मान्यवर नगरसेवकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ध्वजारोहण करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात परेडच्या माध्यमातून सर्वांना सलामी देत कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तृप्ती मिसने केले. संविधानाची स्वीकृती व ‘वंदे मातरम’या राष्ट्रीय गीतास आजच्या दिवशी दीडशे वर्ष पूर्ण झाले आहे. यामुळे आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात कोरुन ठेवण्या सारखा आहे. याचेच औचित्य साधून ईशस्तवना नंतर विद्यार्थ्यांनी समूहगीते, देशभक्तीपर गीते गायली . तसेच मल्लखांब , लाठीकाठी व बासरी वादन यांचीही प्रात्यक्षिके सादर झाली.
या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने सुभेदार मेजर विजयकुमार यादव यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करुन विद्यार्थ्यांनी असाच देशाभिमान जागृत ठेवून देशाची सेवा करत आपला भारत देश स्वर्णिमा कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा व स्वातंत्र्य, समता, बंधुता, विश्वशांती, ही मूल्ये जोपासावीत असे आवाहन केले. आमदार मा.शंकरभाऊ जगताप यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन ज्यांनी या देशासाठी आपले रक्त सांडून आपले बलिदान दिले, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.अशी ग्वाही दिली.

यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक रवीना आंघोळकर, शकुंतला ताई धराडे,पल्लवीताई जगताप,शशिकांत कदम, शामराव जगताप, संजय काटे, ज्ञानेश्वर जगताप, नवनाथ जगताप, तृप्ती कांबळे, हर्षल ढोरे, प्रशांत शितोळे, तसेच संस्था सदस्य विजय जगताप, सूर्यकांत गोफणे, सुरेशदादा तावरे, प्रा.प्रताप बामणे, सदस्या स्वाती पवार, प्राचार्या इनायत मुजावर तसेच पॅरामेडिकल चे प्रमुख अंबिके व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा थीगळे यांनी केले.तर आभार सुचिता खराडे यांनी मानले.

















