Google Ad
Uncategorized

नवी सांगवी च्या ‘द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल’ मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक -26 जानेवारी 2025) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.

प्रथमतः मा.प्रमुख पाहुणे कर्नल के.सी नायर, लेफ्टनंट कर्नल मिसेस नायर,कॅप्टन आर. बी. बाजपेयी, मा. श्री.विजय पांडुरंग जगताप ,मॅनेजमेंट सदस्या- सौ .स्वाती पवार सर्व माजी नगरसेवक, सर्व पी.टी.ए मेंबर, कॉलेजच्या प्राचार्या. मा.इनायत मुजावर  यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ध्वजारोहन करण्यात आले, नंतर सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमास सुरुवात झाली.

Google Ad

26 जानेवारी च्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे परेड, लाठीकाठी, मल्लखांब चे प्रात्यक्षिक बघून उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थ्यांनी कौतुक केले.

पुर्व प्राथमिक ,प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाच्या कु.अक्षज तिमिर ,कु. शौर्य गायकवाड,कुमारी प्रांजल चव्हाण,कु. आयुष्यमान माने, कुमारी. कु.प्रज्ञशा ढवळे, कु. वृद्धंग विश्वासराव) या मुलांनी आपली मनोगते व्यक्त केली.नंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन बरोबरच डॉक्टर, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गांधीजी ,भारतमाता, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशी वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधले.

कर्नल के.सी नायर यांनी राष्ट्र अभिमानाची भावना निश्चितच वृद्धिंगत होऊन राष्ट्रभक्तीशी संबंधित सर्वच मूल्य जोपासले जातील अशी ग्वाही आपल्या भाषणातून दिली.
अशा या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी संस्थेचे, मा.श्री विजय  जगताप, सूर्यकांत गोफणे, श्री.तावडे  तसेच समाजातील सर्व स्तरातील मान्यवर माननीय, प्रतिष्ठित नगरसेवक, कॉलेजच्या प्राचार्या, सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अफरीन खान, सौ. सुचिता खराडे यांनी केले तर सौ. स्वाती पाटील  यांनी आभार मानले शेवटी ‘वंदे मातरम’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!