Google Ad
Editor Choice

२४ तासात अहवाल द्या .… नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालयाचे राज्याला निर्देश

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२५ एप्रिल) : काल राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच सरकारी वकिलांकडून राणा दाम्पत्याच्या ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी होत आहे.

दरम्यान राणा दाम्पत्यानी जामिनासाठी अर्ज केला परंतु जामीन अर्जावर २९ एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर राणा दांपत्याची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे.

Google Ad

यानंतर नवनीत राणांनी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहलं आहे. या पात्रात त्या म्हणाल्या कि, मी खालच्या जातीची असल्यानं मला तुरूंगात पाणी देखील दिल नाही. तसेच मी रात्रीच्या वेळी बाथरूमचा वापर करणार होते पण तुरूंग प्रशासनानं माझ्या मागणीचा विचार देखील केला नाही. माझ्याशी बोलताना तेथील कर्मचाऱ्यांनी अभद्र भाषेचा वापर केला. सर्वात गलिच्छ शिव्या मला देण्यात आल्या, असा गंभीर आरोप राणा यांनी केला आहे.

आता यानंतर राणांच्या तक्रारीनंतर आता लोकसभा सचिवालयाने राज्य सरकारला अहवाल देण्यासंबंधी निर्देश दिले आहेत. येत्या 24 तासांमध्ये हा अहवाल द्यावा असे निर्देश लोकसभा सचिवालयाने दिले आहे. नवनीत राणा या लोकसभेच्या सदस्या आहेत त्यामुळे त्यांना काही विशेषाधिकार आहेत. त्यामुळे लोकसभा सदस्यांच्या विशेषाधिकाराचं उल्लंघन केल्याचं नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, आता या आरोपांची सत्यता पडताळणी या अहवालामध्ये केली जाणार आहे. याच्या आधीही खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांवर हक्कभंग मांडला होता. अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंबंधीच्या प्रकरणात हा हक्कभंग मांडला होता. त्यावरही लोकसभा सचिवांनी तातडीने दखल घेण्यात आली होती.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!