Google Ad
Editor Choice

महानगरपालिका , नगरपरिषदा , नगरपंचायती , जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव नोंदणी करावी- राज्य निवडणूक आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८नोव्हेंबर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नावे नोंदवावित किंवा आवश्यक त्या दुरूस्त्या कराव्यात, असे आवाहन राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी केले आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार,आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार *मा.श्री लक्ष्मणभाऊ जगताप* यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात *नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार असुन ज्यांचे नांव मतदार यादी मध्ये नाही त्यांना आपले नांव मतदार यादी मध्ये समाविष्ट करण्याची संधी आलेली आहे.* तरी आपणा सर्वांना विनंती करण्यात येते आपण या संधीचा फायदा घेऊन आपले नांव मतदार यादी मध्ये समाविष्ट करावे.

Google Ad

तुम्ही विधानसभेच्या ज्या मतदान केंद्रावर आपले मत दिले तेथे नोव्हेंबर महिन्याच्या *दुसरा आणि तिसरा शनिवार आणि रविवार दिनांक १३/११/२०२१, १४/११/२०२१, २०/११/२०२१ आणि २१/११/२०२१* सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत फोटो मतदार यादी प्रदर्शित केली जाईल, आपण आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करू शकता. जर नांवात काही चूक असेल तर तुम्ही दुरुस्तीसाठी फॉर्म भरू शकता. या व्यतिरिक्त नवीन मतदार नोंदणी करिता फाँर्म नंबर ६ भरावा लागेल. या संधीचा आपण जरुर लाभ घ्यावा किंवा आमचे कार्यकर्ते नवीन मतदार नोंदणी आँनलाईन फाँर्म भरण्यासाठी आपणा कडे आल्यावर त्यांना योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे.

*नवीन मतदार नांव नोंदणी साठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.*

*१) दोन रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो.*
*२) रेशन कार्डची छायांकित प्रत.*
*३) आधार कार्डाची फोटोकॉपी.*
किंवा
*४) जन्मतारखेच्या तारखेची छायांकित प्रत.*
*(१ जानेवारी २०२२ रोजी वय १८ वर्षांचे असणे आवश्यक आहे.)*
*५) घरातील किंवा शेजारील कोणत्याही एका सदस्याच्या मतदार कार्डाचा इपिक नंबर.

वरील तारखांना बीएलओ सर्व मतदान केंद्रावर बसतील.

मदान यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात येणारी विधानसभा मतदार संघांच्याच मतदार याद्या महानगरपालिका, नगरपरिषदा/ नगरपंचायती, जिल्हा परिषदा/ पंचायत समित्या व ग्रामपंचायती या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जशाच्या तशा वापरल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही मतदार यादी प्रभागनिहाय विभाजित करताना नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावांत किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कुठलीच कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. त्यामुळे विधानसभेच्या मतदार यादीत नाव नसल्यास नावांची नोंदणी करणे, दुबार नावे वगळणे किंवा नावांतील अथवा पत्यांमधील दुरूस्त्या करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ही एक चांगली संधी आहे.

मतदार नोंदणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी 1 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी 1 जानेवारी 2022 हा अर्हता दिनांक आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती आता मतदार म्हणून आपले नाव नोंदवू शकते. मतदार नोंदणीसाठी फक्त निवासाचा आणि वयाचा दाखला; तसेच स्वत:चे छायाचित्र आवश्यक असते. राज्यात राज्य निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्यातून व समन्वयाद्वारे व्यापक प्रमाणावर मदतार नोंदणी मोहीम राबविली जात आहे, अशी माहितीही श्री. मदान यांनी दिली.

मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम
· प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी: 1 नोव्हेंबर 2021
· प्रारूप मतदार याद्यांवर दावे व हरकती दाखल करणे: 30 नोव्हेंबर 2021
· दावे व हरकती निकाली काढणे: 20 डिसेंबर 2021 पर्यंत
· अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी: 5 जानेवारी 2022
आपण हे करू शकतो
· विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे

· 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारी व्यक्ती नाव नोंदवू शकते
· आपल्या संबंधित मतदार याद्यांतील दुबार/ समान नोंदीदेखील वगळता येतील
· आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील
· एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाला असल्यास पत्यात बदल करावा
· आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे
· नाव नोंदविल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान करू शकाल
नाव नोंदणी कुठे कराल?

· ऑनलाईन नाव नोंदणीसाठी- http://www.nvsp.in
· छापील अर्जाद्वारे नाव नोंदणी- मतदान केंद्र किंवा अन्य निर्देशित ठिकाणे
नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने
· प्रथम नाव नोंदणीसाठी किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केले असल्यास: अर्ज क्र. 6

· अनिवासी मतदाराचे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी: अर्ज क्र. 6अ
· इतर नावाबाबत आक्षेपासाठी, स्वत:चे किंवा मृत व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी: अर्ज क्र. 7
· मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी: अर्ज क्र. 8
· एकाच मतदारसंघातील निवासाचे ठिकाण बदलले असल्यास: अर्ज क्र. 8अ
निवासाचा दाखला (कोणताही एक)
· जन्म दाखला
· भारतीय पारपत्र
· वाहन चालक परवाना
· बँक/ किसान/ पोस्ट पासबूक
· सिधावाटप पत्रिका
· प्राप्तिकर निर्देशपत्रिका
· पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक
· टपाल खात्याद्वारे प्राप्त टपाल/ पत्र
वयाचा दाखला (कोणताही एक)
· भारतीय पारपत्र
· वाहन चालक परवाना
· पॅन कार्ड
· शाळा सोडल्याचा दाखला
· 12 वी, 10 वी, 8 वी किंवा 5 वीची गुणपत्रिका
· आधार कार्ड
· 21 वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-3
ऑनलाईन नाव नोंदणीसाठी
· कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत
· कागदपत्रांची व छायाचित्राची फाईल JPG/ JPEG असावी.
Tags: Election
हेही वाचा
मतदार नोंदणी (संक्षिप्त पुनरीक्षण) कार्यक्रम
· प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी: 1 नोव्हेंबर 2021
· अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी: 5 जानेवारी 2022
आपण हे करू शकतो
· विधानसभेच्या प्रारूप मतदार यादीतून आपल्या नावाची खात्री करणे
· आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरूस्त्याही करता येतील
· आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचे नाव वगळावे

नाव नोंदणी कुठे कराल?
· ऑनलाईन नाव नोंदणीसाठी- www.nvsp.in
नाव नोंदणीसाठीच्या अर्जाचे नमुने

· मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरूस्त्या करण्यासाठी: अर्ज क्र. 8
निवासाचा दाखला (कोणताही एक)
· जन्म दाखला
· भारतीय पारपत्र
· वाहन चालक परवाना
· बँक/ किसान/ पोस्ट पासबूक
· सिधावाटप पत्रिका
· प्राप्तिकर निर्देशपत्रिका
· पाणी/ दूरध्वनी/ वीज/ गॅस देयक
· टपाल खात्याद्वारे प्राप्त टपाल/ पत्र
वयाचा दाखला (कोणताही एक)
· भारतीय पारपत्र
· वाहन चालक परवाना
· पॅन कार्ड
· शाळा सोडल्याचा दाखला
· आधार कार्ड
· 21 वयोगटावरील प्रथमच नोंदणी करणाऱ्यांसाठी जोडपत्र-3
ऑनलाईन नाव नोंदणीसाठी
· कागदपत्रे व छायाचित्र दोन एमबीच्या आत असावेत
· कागदपत्रांची व छायाचित्राची फाईल JPG/ JPEG असावी.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

86 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!