Google Ad
Editor Choice

” ड्रायव्ह इन लसीकरण केंद्र सुरू करणेबाबत … स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे यांची मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४जून) : पिंपरी चिंचवड शहरातील, करोना ( कोविड -१९ ) या संसर्गजन्य रोगाचा प्रसार नियंत्रणात आणण्याकरीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहे . पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेकडून प्रभागामध्ये सध्या विविध ठिकाणी वय ४५ वर्षावरील नागरिकांसाठी करोना ( कोविड -१९ ) प्रतिबंध लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे . करोना ( कोविड -१९ ) प्रतिबंध लसीकरणाचा अपुरा साठा , लसीकरणाची वाढती मागणी तसेच लसीकरण केंद्रांची कमी संख्या लक्षात घेता लसीकरण केंद्रांवर दररोज नागरिकांची सतत गर्दी होत असते.

ज्येष्ठ नागरिक आणि शाररीक व्यंग्य असलेल्या व्यक्तींना करोना लस घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे रहावे लागते . त्यामुळे लसीकरण केंद्रावरील सततच्या गर्दीमुळे करोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका असतो . ही बाब लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेमार्फत दादरमधील बहुमजली कोहिनुर स्क्वेअर इमारतीमधील सार्वजनिक वाहनतळात ” ड्रायव्ह इन लसीकरण केंद्र ” ( कोविड -१ ९ लसीकरण ) सुरू करण्यात आले असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच शाररीक व्यंग असलेल्या व्यक्तींना गाडीत बसूनच लस घेता येणार आहे .

Google Ad

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेकडून देखील मुंबईच्या धर्तीवर दापोडी येथील गणेशनगर भागातील माता शितळादेवी मंदिारलगत आपल्या खाजगी मोकळ्या जागेमध्ये “ ड्रायव्ह इन लसीकरण केंद्र ” ( कोविड -१ ९ लसीकरण ) सुरू करण्यात यावे . अशी मागणी स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात अनिकेत काटे यांनी म्हटले आहे की, लसीकरण केंद्रांवरील नागरिकांची गर्दी कमी होवून गाडीमध्ये बसून ज्येष्ठ नागरिक आणि शाररीक व्यंग्य असलेल्या व्यक्तींना प्रतिबंध लस घेता येणार आहे . तरी आपणामार्फत बरीक गोष्टींचा गांभीर्याने विचार करून दापोडी येथील माता शितळादेवी मंदिरालगत माझ्या खाजगी मोकळया जागेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत “ ड्रायव्ह इन लसीकरण केंद्र ” सुरू करण्यात यावे अशी मागणी स्वीकृत नगरसेवक अनिकेत काटे यांनी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

55 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!