Google Ad
Uncategorized

‘या’ पदासांठी उमेदवार करू शकतात अर्ज … पुणे महापालिकेत होणार मोठी नोकरभरती

महाराष्ट्र 14 न्यूज, दि२३ फेब्रुवारी:   पुणे महापालिकेडून मोठी नोकरीभरती करण्यात येणार आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात ४४८ पदांची भरती पूर्ण केल्यानंतर आता याचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ११ प्रकारच्या पदांसाठी ३४० जागांची भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे.

यामध्ये अग्निशामक दलाचे २०० पदे, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची २० पदे, आरोग्य निरीक्षकांसाठी ४० पदे व इतरही पदांची भरती होणार आहे. यासह इतर विभागातील पदांची देखील भरती होणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हा भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला आहे.

Google Ad

राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविली गेली होती. यामुळे पालिकेने मागीलवर्षी कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण निरीक्षक, लिपिक पदाच्या तब्बल ४४८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. आयबीपीएस संस्थेकडून आॅनलाइन परीक्षा पारदर्शकपणे पार पाडली, त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत घेतले आहे. या पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता आणखी ११ पदांसाठी एकूण ३४० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

यामध्ये अग्निशामक दल आणि आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी रोस्टर तपासणी करून तब्बल ३४० पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. आयुक्तांनी त्यास मान्यता दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला आहे. या प्रस्तावानुसार आयबीपीएस या कंपनीकडेच भरतीची जबाबदारी दिली जाणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!