Google Ad
Agriculture News Maharashtra

Sinner : चार एकर कोथिंबीर पिकातुन ४१ दिवसांत १२ लाख ५१ हजाराचे विक्रमी … बळीराज्याच्या मालाला मिळाला भाव!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या काळात होत असलेल्या लॉकडाऊन मध्ये देशवासीयांना आधार देण्यात सर्वात आघाडीवर कोण असेल तर तो शेतकरी वर्ग आहे याची प्रचिती सर्वांनीच घेतली. शेतकरी काय करु शकतो याचा अनुभव याची देही याची डोळा नागरिकांनी घेतला. सोशल मीडिया बुद्धीला खाद्य पुरवेल पण पोट भरण्यासाठी शेतकऱ्याने पिकवलेलं धान्यच खावं लागतं, ते गुगल, फेसबुक किंवा ट्विटर आणि इतर कोणतंच माध्यम देऊ शकणार नाही हे आजचं वास्तव आहे. या वास्तवाची जाणीव ठेवत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे राहणाऱ्या ‘विनायक हेमाडे’ यांनी लॉकडाऊन काळात कोथिंबीरच विक्रमी उत्पादन घेतलं आहे.

चार एकर कोथिंबीर पिकात १२ लाख ५१ हजार रुपयांचं उत्पन्न काढत हेमाडे यांनी अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. ४५ किलो कोथिंबीरीच्या बियाण्यातून त्यांनी हे विक्रमी उत्पादन घेतलं आहे. अवघ्या सव्वा महिन्याच्या काळात हे पीक त्यांनी घेतलं आहे. तयार झालेलं सर्व पीक त्यांनी दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांना दिलं आहे. एकूण १२ लाख ५१ हजार रुपयांसाठी हा सौदा ठरला असून पीक लागवड करताना कुठल्याही अवास्तव मोबदल्याची अपेक्षा मी केली नाही असं हेमाडे यांनी सांगितलं.

Google Ad

विनायक हेमाडे यांचा चेहऱ्यावर समाधानी भाव असलेला एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अगदी माफक खर्चात, भरघोस फायदा मिळाल्याने हेमाडे यांच्या आनंदाला भलतंच उधाण आलं आहे. विनायक यांची पत्नी शहरी भागातील असून पूर्वी शेतीचं कोणतंही ज्ञान नसताना त्यांनी हवी तशी मदत केली. अवघ्या कुटुंबाने केलेल्या मदतीमुळे यावर्षी चांगलं पीक आल्याचं सांगत मुलींनी शिक्षणाबरोबरच शेती सुद्धा केली पाहिजे असं आवाहन केलं.

आपल्या कंपनीच्या वाणाला विक्रमी भाव मिळाल्यानं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तात्काळ शेतकऱ्याची थेट बांधावर जात भेट घेतली असून त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. एकीकडे बळीराजाच्या मालाला भाव मिळत नाही असं बोललं जातं मात्र योग्य व्यवस्थापन व योग्य पिकाची योग्य वेळी निवड केल्यास भावही उच्चांकी मिळू शकतो हे हेमाडे यांनी दाखवून दिलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!