महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ मे) : वर्ल्ड कराटे फेडरेशन ( WKF ) ही 198 सदस्य देशांसोबत कराटे खेळाची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही ऑलिम्पिक समिती द्वारा मान्यता प्राप्त अशी एकमेव संघटना आहे. त्याचे शंभर मिलियन पेक्षा अधिक सदस्य आहेत. अशा या संघटनेच्या राबट, मोरोको येथे झालेल्या वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच परीक्षेसाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील माननीय रवींद्र सूर्यवंशी यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत भारतातून पाच पंच उत्तीर्ण झाले आहे. रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हजारो विद्यार्थी कराटे प्रशिक्षण घेत आहेत, तसेच शेकडो खेळाडूनीं राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. पुणे शहरातील प्रथम काता कुमिते पंच म्हणून त्यांनी एक नवीन ओळख निर्माण केली आहे
या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी डब्ल्यूकेएफ ज्युनियर आणि सीनियर कराटे विश्व चैंपियनशिपचे नियोजन करतात, जो प्रत्येक दुसर्या वर्षी आयोजित केला जातो. WKF चे अध्यक्ष एंटोनियो एस्पिनोस आहेत आणि मुख्यालय मॅड्रिड, स्पेन मध्ये स्थित आहे. रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १३ ऑगस्ट २०२५ :* हातामध्ये तिरंगा घेऊन चालणारे विद्यार्थी, देशभक्तीच्या घोषणांनी…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ११ ऑगस्ट २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना महापालिकेच्या सर्व सुविधा…
यापूर्वी, नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागे. अनेक वेळा…
आमचे खरे आयडॉल हिरो तर तुम्हीच आहात, याची प्रचिती देत सर्व कर्नल व त्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम, रंगभूमीचा आशिर्वाद घेत २३ वर्षांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…