Google Ad
Uncategorized

वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच परीक्षेत पिंपरी चिंचवड शहरातील ‘रवींद्र सूर्यवंशी’ यांची उतुंग भरारी … भारतातील पाच पंचात समावेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ मे) : वर्ल्ड कराटे फेडरेशन ( WKF ) ही 198 सदस्य देशांसोबत  कराटे खेळाची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.  ही ऑलिम्पिक समिती द्वारा मान्यता प्राप्त अशी एकमेव संघटना आहे. त्याचे शंभर मिलियन पेक्षा अधिक सदस्य आहेत. अशा या संघटनेच्या राबट, मोरोको येथे झालेल्या वर्ल्ड कराटे फेडरेशनच्या पंच परीक्षेसाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील माननीय रवींद्र सूर्यवंशी यांनी ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेत भारतातून पाच पंच उत्तीर्ण झाले आहे. रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हजारो विद्यार्थी कराटे प्रशिक्षण घेत आहेत, तसेच शेकडो खेळाडूनीं राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. पुणे शहरातील प्रथम काता कुमिते पंच म्हणून त्यांनी एक नवीन ओळख निर्माण केली आहे

Google Ad

या संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी डब्ल्यूकेएफ ज्युनियर आणि सीनियर कराटे विश्व चैंपियनशिपचे नियोजन करतात, जो प्रत्येक दुसर्‍या वर्षी आयोजित केला जातो. WKF चे अध्यक्ष एंटोनियो एस्पिनोस आहेत आणि मुख्यालय मॅड्रिड, स्पेन मध्ये स्थित आहे. रवींद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!