Google Ad
Editor Choice Health & Fitness Technology

रशियाने बनविलेल्या लसीची होणार १० किंवा १२ ऑगस्टला नोंदणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : रशियाने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची त्या देशातील औषध नियंत्रकांकडे १० किंवा १२ आॅगस्टला नोंदणी करून त्यानंतर तीन ते सात दिवसांनी ती जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. जगात विविध देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी चाचण्या व प्रथम शोध कोण लावतो याबाबत स्पर्धा चाललेली असताना, त्यात रशिया बाजी मारणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

च्मॉस्कोमधील गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट आॅफ एपिडेमिआॅलॉजी अँड मायक्रोबायॉलॉजी (जीआरआयइएम) या संस्थेने ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. च्या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीनही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे या महिन्याच्या प्रारंभी रशियाने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती थोडी निराळी होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा जुलैच्या दुसºया आठवड्यात पूर्ण झाला होता. त्या चाचण्यांचा दुसरा टप्पा १३ जुलैला सुरू झाला, असे रशियाच्या तास या वृत्तसंस्थेने म्हटले होते.

Google Ad

च्कोणत्याही लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण झाल्याशिवाय तिचा वापर जनतेसाठी करण्यास परवानगी देण्यात येत नाही. मानवी चाचण्यांचा प्रत्येक टप्पा कित्येकदा काही महिन्यांपर्यंत सुरू राहातो. त्यामुळे रशियाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा टाळून तिच्या वापरास परवानगी देण्याचा घाट तेथील सरकारने घातला असावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीआरआयइएम या संस्थेने तयार केलेल्या लसीची सशर्त नोंदणी करण्यात येईल, असे रशियातील औषध नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे. या लसीला मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा पूर्ण करावाच लागेल. त्यानंतर या लसीचा जनतेसाठी वापर करण्याकरिता परवानगी मिळू शकेल.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!