Google Ad
Uncategorized

रांजणगाव सांडस, ता. शिरूर येथे पंकज महाराज गावडे यांची किर्तन सेवा झाल्यानंतर जगद्गुरूंच्या मंदिरासाठी १ लाख ५२ हजार रुपये देणगी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ एप्रिल) : पुणे जिल्ह्यातील भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी साऱ्या विश्वाला मार्गदर्शक असणाऱ्या गाथेची निर्मिती केली होती. भंडारा डोंगरावर अनेक धार्मिक सोहळे होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक लोक या ठिकाणी गाथा पारायण सोहळा करण्यासाठी येतात . याकरिता भव्य मंदिर असावे, असे सर्व भक्तांना वाटत होते. आणि मनोकामना डोळ्यासमोर ठेवून भंडारा डोंगर समितीने तुकाराम महाराजांच्या भव्य अशा मंदिराचे काम हाती घेतले आहे. यास जवळपास १२५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.या मंदिराच्या उभारणीसाठी समाजातील अनेक भक्तांनी आणि उद्योजक , दानशूर मंडळींनी मदतीचा हात पुढे केला आहे.

शिरूर, रांजणगाव सांडस, येथील संदीप ढमढेरे ह्यांच्या आईंच्या वडिलांच्या स्मृतिदिनी ह.भ.प.पंकज महाराज गावडे यांची किर्तन सेवा झाली, ह्या प्रसंगी त्यांचे मित्र संदीप शेठ ह्यांनी अगोदर ही १ लाख रुपये मदत केली होती व पुन्हा गावडे महाराजांच्या किर्तन सेवेत त्यांच्या आजोबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, पुन्हा १ लाख रुपये देणगी म्हणून दिली तसेच आजोबा वै. विठ्ठल आप्पा रणदिवे कुटुंबीयांनी २१ हजार मानधन देणगी रोख रूपाने दिली.

Google Ad

तसेच दत्तात्रय उर्फ आप्पा महाराज सूर्यकांत रणदिवे ह्यांनी देखील २१ हजार रुपये जाहीर केले आणि श्री भानुदास चोरमले ह्यांनी १० हजार रुपये  किर्तन श्रवण केल्यानंतर प्रेरित होऊन दिले. ही सर्व रक्कम श्री क्षेत्र भंडारा डोंगर चे ह्या माझ्या संकल्पीय कार्यासाठी शिरूर तालुक्याचे संयोजक म्हणून काम पाहणारे उद्योजक संदीप भाऊ कुटे, किरण भाऊ काळे ह्यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली जे ही रक्कम ट्रस्ट कडे जमा करण्यात आल्या.

संदीप शेठ ढमढेरे हे देखील संयोजक म्हणून कार्य करताना स्वतःचे आतापर्यंत २ लाख रुपये मंदिरासाठी त्यांनी दिले आहेत. ह्या कीर्तनावेेेळी संदीप शेठ ह्यांनी तसेच जिल्हा परिषद सदस्या रेखा ताई बांदल, निखिल दादा बांदल, संदीप भाऊ कुटे, किरण भाऊ काळे, गायनाचार्य बंधू प्रविण महाराज सोळंके, मृदुंगाचार्य व्यंकटेश आबा महाराज फड तसेच ह्या प्रसंगी मित्र योगिराज उद्योग समूहाचे राहुल जी कर्पे आणि आध्यत्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

माझा श्वास जगद्गुरु संत तुकोबाराय ह्यांच्या कार्यासाठी त्यांच्याच असीम कृपेने ह्या पामराला उत्तम किर्तन सेवा करता आली मंदिरासाठी मदत गोळा करता आली आणि त्यांच्या विचारांचा जागर करता आला ह्याचे मोठे समाधान मिळाले. असे ह भ प डॉ. पंकज महाराज गावडे म्हणाले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!