Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पुणे – सोलापूर महामार्गावरील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडेंचा उपचारा दरम्यान मृत्यू … झाला होता खुनी हल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१जुलै) : पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल गारवाचे मालक रामदास आखाडे यांचा उपचारा सुरू असताना पहाटे मृत्यू झाला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. याप्रकरणी खुनाच्या गुन्हाचे कलम वाढवण्यात येणार आहे, लोणी काळभोर पोलिसांनी सांगितले. रामदास आखाडे (वय 38) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

रविवारी रात्री रामदास हे त्यांच्या हॉटेल गारवा समोर खुर्चीवर बसले होते. ते फोनवर बोलत असताना पायी चालत त्यांच्याजवळ असलेल्या अज्ञात तरुणाने त्यांच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले होते. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Google Ad

उरळी कांचन परिसरात हॉटेल गारवा प्रसिद्ध आहे. दरम्यान याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यात मारणारा तरुण पायी चालत आला आणि त्याने सपासप वार केला. त्यानंतर तो तेथून पळाला व दुचाकी घेऊन थांबलेल्या साथीदारासोबत पसार झाला असल्याचे दिसत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!