Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथे प्रतिभा महिला प्रतिष्ठाण अंतर्गत रमाई महिला प्रतिष्ठाण आयोजित … गौरी गणपती सजावट स्पर्धा , बक्षीस वितरण समारंभ , खेळ पैठणीचा आणि सामाजिक गुणगौरव समारंभ संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३० सप्टेंबर) : आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या प्रयत्नातून प्रतिभा महिला प्रतिष्ठाण अंतर्गत रमाई महिला प्रतिष्ठाण आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धा,बक्षीस वितरण समारंभ,खेळ पैठणीचा आणि सामाजिक गुणगौरव समारंभ 2021 (वर्षे ४ थे) रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव येथे संपन्न झाला.

पिंपळे गुरव मधील रामकृष्ण मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गौरी गणपती बक्षीस वितरण, आदर्श माता पिता, विविध सामाजिक संस्था, गृहरचना संस्था, गणपती मंडळ, महिला मंडळ, महिला बचत गट, खेळाडू, आरोग्य कर्मचारी, आरोग्य केंद्र, कोविड योद्धे , विशेष गुणगौरव पुरस्कारांचे वितरण पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर मा. उषा (माई) ढोरे, सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप (अध्यक्ष प्रतिभा महिला प्रतिष्ठान)

Google Ad

मा. नगरसेवक शंकरशेठ जगताप, नगरसेवक शशिकांतआप्पा कदम, नगरसेविका सौ.उषाताई मुंढे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका सौ.शारदाताई सोनावणे, नगरसेविका सौ. सीमाताई चौगुले, स्विकृत नगरसेवक महेश जगताप, सौ. वैशालीताई राहुल जवळकर (सांगावी- काळेवाडी भाजपा महिला मंडल अध्यक्ष) सौ.रविना सागर आंगोळकर, सौ.सुषमाताई शशिकांत कदम, सौ.पल्लवीताई महेश जगताप, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पिंपळे गुरव मधील सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी युवा कार्यकर्ते मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमास पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे आयोजक मा. सागर सुनील आंगोळकर (नगरसेवक, अध्यक्ष ड प्रभाग) यांनी उपस्थित मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे तसेच नागरिकांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

28 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!