Categories: Editor Choice

चिंचवडचे ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या मतदानाने भाजपचा विजय सुखकर होणार, उद्या मुंबईत जाऊन करणार मतदान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .०९ जून) : राज्यसभा निवडणुकीला आता अवघे काहीच तास उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपआपले आमदार मतदानासाठी एकाछताखाली आणण्यास सुरूवात केली आहे.राज्यसभा निवडणूक उद्या 10 तारखेला होणार आहे. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठी चुरस लागणार हे स्पष्ट झालं आहे.

या पार्श्वभूमीवर कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी आप आपल्या पक्षांनी आपले आमदार मुंबईतील हाॅटेलमध्ये ठेवले आहेत. तर चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आजारी असल्याने ते हाॅटेल ताजमध्ये नाहीत. त्यांना उद्या मतदानासाठी मुंबईत आणले जाणार आहे.

पुण्यातील दोन्ही आमदारांना मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. शिवसेना उमेदवार संजय पवार आणि भाजप आमदार धनंजय महाडिक यांच्यात रस्सीखेच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उद्या निवडणूक असल्याने सर्वच पक्षांचे धाबे दणाणले आहे. उद्याच्या मतदानाचे नियोजन करण्यासाठी अथवा अपक्ष आमदार आपल्याकडे वळवण्यासाठी सत्ताधारी आघाडी आणि भाजप यांच्यात मोठी चुरस लागली आहे.दरम्यान, अशातच भाजपच्या 2 आमदारांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना मतदानासाठी कसे आणायचे, असा सवाल भाजपसमोर होता. परंतु या दोन्ही आमदारांना विधानभवनात आणण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.
व्हीलचेअरवरुन हे दोन्ही आमदार मतदानासाठी येणार आहेत.
जगताप यांना एअर अँम्बुलन्सने विधानभवनात आणण्यात येणार आहे, तसेच, टिळक सध्या मुंबईतच असल्याची माहिती आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

16 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

20 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago