Google Ad
Editor Choice

राजमाता जिजाऊ गार्डन ग्रुप नवचैतन्य हास्य परिवार सूर्यनमस्कार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने … राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे भव्य दीपोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०९ नोव्हेंबर) : राजमाता जिजाऊ गार्डन ग्रुप नवचैतन्य हास्य परिवार सूर्यनमस्कार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रसाद जाधव, मुन्ना भाई शेख बाळासाहेब देवकर, पोपट अण्णा, रणपिसे महाराज, अरुण शिंदे, अश्विनी,तोडकर बाबा,अरुण तोडकर,सुभाष खुडे,अड.रणजित डॉमसे, नवचैतन्य हास्य परिवाराचे सर्व ज्येष्ठ सदस्य, सूर्यनमस्कार ग्रुपचे सर्व सदस्य.यांनी सहभाग घेतला याप्रसंगी दीपोत्सवाबद्दल माहिती प्रा. उमेश बोरसे यांनी दिली.

उद्यानामध्ये गेल्या पाच वर्षापासून या तीनही ग्रुपच्या माध्यमातून संयुक्तरित्या दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील भव्य असे आयोजन करण्यात आले होते त्यात आपल्या परिसरातील शेकडो बंधू आणि भगिनी आणि लहान बालकांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवला. दरवर्षी अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या उद्यानामध्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि शंकर शेठ परिवाराच्या मार्गदर्शनाने राबवले जातात. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उद्यानातील सर्व सुरक्षा कर्मचारी उद्यानाचे अधिकारी यांनी सहकार्य केले..

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!