Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Mumbai : कर्नाळा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी … शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने घेतले ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा सहकारी बँक घोटाळाप्रकरण शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीने (ED) काल ताब्यात घेतले होते. त्यांना 25 तारखेपर्यंत ईडीची कोठडी ठोठावण्यात आली आहे. कर्नाळा बॅंक घोटाळ्याबाबत ईडीने त्यांना अटक केली होती.

कर्नाळा सहकारी बँकेत सुमारे 600 कोटीचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळाप्रकणात शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा हात असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी ठेवीदारांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. काल त्यांना ईडीने (ED) ताब्यात घेतले होते.

Google Ad

विवेक पाटील यांना पनवेलमधून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना ईडीच्या न्यायालयात आणण्यात आले. आज त्यांना 25 तारखेपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, कर्नाळा सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचे पुढे आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आली होती. काल या प्रकरणात ईडीने (ED) कारवाई केली. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात संचालकांसह 76 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोट्यवधींचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!