महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ मे) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणा-या व्यावसयीकांची माहिती काढुन कारवाई करणे बाबत दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अरविंद पवार व अंमलदार तळेगाव चिंचवड पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना. पोलीस हवालदार प्रदीप गोडांबे व पोलीस नाईक आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरुन अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचेकडील अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह मे. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५, चित्तराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे याठिकाणी छापा घातला.
या छाप्यात ‘मे महाराष्ट्र मिल्क डेअरीचे’ मालक साजीद मुस्तफा शेख वय ३२ वर्षे रा. शिवर्तीथनगर, संभाजी बारणे यांचे ऑफीसजवळ, पडवळनगर थेरगाव पुणे, जावेद मुस्तफा शेख वय ३८ वर्षे रा. सदर कामगार, राकेश श्रीबुध्दराम सिंग वय २६ वर्षे रा. महाराष्ट्र मिल्क डेअरी, सर्वे नं. २९५, चितराव गणपी मंदीरा जवळ चिंचवड पुणे, अल्ताफ हजरतदीन शेख वय २७ वर्षे रा. सदर अभिषेककुमार योगेशबाबु यादव वय २२ वर्षे रा. सदर , सर्फराज शराफतउल्ला शेख वय ३५ वर्षे रा. सदर यांना ताब्यात घेतले.
त्यांचेकडुन भेसळयुक्त पनीर तयार करण्याकरीता चापरत असलेले १४,००० /- रुपये किंमतीचे १४० लिटर अॅसेटीक अॅसीड ६,३२०/-रुपये किंमतीचे ६० लिटर आरबीडी पामोलीन तेल. ४,५००/- रुपये किंमतीचे २५ किलो ग्लिसरील मोनो स्टीयरेट ३.३२,५००/-रुपये किंमतोची ८७५ किलो स्किम्ड मिल्क पावडर, १०९,२००/-रुपये किंमतीचे ५४६ किलो भेसळयुक्त तयार पनीर असा एकुण ४,६६,५२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जप्त करुन, पुढील कारवाईकामी ताब्यात घेतला आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२० मे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम निकालात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.13 मे : परिचर्या सेवेच्या जनक फ्लोरेन्स नाइटिंगेल यांची जयंती म्हणून जागतिक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे २५.: नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१३ मे : चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप मित्र परिवार आणि भाजपचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ मे : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ७ मे २०२५ :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशाकीय भवनात धमाक्यांचा आवाज…सर्वत्र…