Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

पिंपळे गुरवमधील अनेकांना लाखोंचा गंडा … ५ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील अभंग कॉलनी मधील राहुल जयप्रकाश गायकवाड (वय ४०) तसेच त्यांची पत्नी निवेदिता उर्फ मोनिका गायकवाड (वय ३६) रा. श्री. संत अभंग कॉलनी, पुना मार्बल गल्ली, पिंपळे गुरव यांच्यावर शनिवारी रात्री सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सप्टेंबर २०२० ते ९ एप्रिल २००२२ या कालावधीत घडली. याप्रकरणी नारायण रघुनाथ चिघळीकर (वय ५२), रा. गुरुद्वारा चौक, चिंचवड यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पिंपळे गुरव येथील राहुल गायकवाड तसेच त्यांची पत्नी निवेदिता उर्फ मोनिका गायकवाड यांनी चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून रकमेचा अपहार करून फिर्यादी व इतर काही लोकांची मिळून ५ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. सदर रक्कम फिर्यादी व इतर लोकांना न देता बुडविण्याच्या हेतूने निवेदिता गायकवाड व राहुल गायकवाड यांनी फिर्यादी व इतर लोकांना फसविले.

Google Ad

आरोपी निवेदिता गायकवाड व राहुल गायकवाड यांनी परताव्याचे आमिष दाखवून आरोपी व इतर लोकांकडून वेळोवेळी रकमा घेऊन त्या रकमेचा अपहार करून फसवणूक केली. या पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव करीत आहेत.
याप्रसंगी सांगवी पोलीस ठाण्यात पिंपळे गुरव परिसरातील फसवणूक झालेल्या महिला व पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होईपर्यंत नागरिक थांबून होते.

सुशिक्षित नागरिकांनी असा व्यवहार करण्याआधी थोडा विचार करणे अत्यावश्यक आहे. कमीतकमी व्यवहार करण्याआधी पोलीस चौकीत येऊन याबद्दल माहिती देणे अत्यावश्यक होते. आम्ही पोलीस फसवणूक झालेल्या नागरीकांचे पैसे तर नाही देऊ शकत. परंतु फसवणूक करणाऱ्या त्या दोघांना अटक करू. पुढे कोर्ट ठरवेल त्यांचे काय करायचे.
सुनील टोनपे, सांगवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक

राहुल व पत्नी निवेदिता गायकवाड हे बांधकाम व्यवसाय, जागा खरेदी-विक्री महालक्ष्मी फर्म या नावाने व्यवसाय करीत असत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. फ्लॅट खरेदीसाठी नागरिकांच्या संपर्कात जाऊन त्यांच्याशी गोड बोलून, विश्वासात घेऊन, आमिष दाखवून पैसे गोळा करायचे

दोघेही पिंपळे गुरव मध्ये सुरवातीला साडी विक्रीचा व्यवसाय करीत असत. त्यानंतर दोघांनी मिळून लिलाव बिशी सुरू केली होती. जांभुळकर पार्क येथे साडे तीन गुंठे जागा घेतली. तिथे साई लक्ष्मी व लक्ष्मी नारायण या नावाने दोन चार मजली इमारती उभ्या केल्या. त्यानंतर पुन्हा श्री संत अभंग कॉलनीत दीड गुंठा जागा घेतली. त्या जागेत कन्स्ट्रक्शन चालू होणार आहे. असे सांगून घरगुती महिलांना दोघेही महिलांना विश्वासात घेऊन पैसे गुंतविण्यास सांगत असे. यावेळी लोकांना हात उसनवारी म्हणून कोर्टातील ५०० रुपयांच्या स्टँप पेपर लिहून देत असे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!