महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. येथे 10 मे रोजी 224 जागांसाठी 2,615 उमेदवारांना 5.13 कोटी मतदारांनी मतदान केले. आज (13 मे रोजी) निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाला 136 हून अधिक जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे.
र्नाटकात किंगमेकरची भूमिकेत असलेल्यांचं दुकान बंद झालं आहे. कर्नाटकने काँग्रेसला पूर्ण बहूमत दिलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपने 65 जागा जिंकल्या आहेत तर किंगमेकरच्या भूमिकेत असलेला जेडीएस 19 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेस भाजप आणि जेडीएसचे देखील तोंड बंद केले आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या विजयात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विसरून चालणार नाहीये.
भाजपला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला मिळवून दिलेल्या या विजयामागे पक्षाच्या 2 दक्षिण भारतीय राजकारण्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. एक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दुसरे काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार.
महत्वाचे म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांची गेल्या वर्षीच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. खर्गे काँग्रेस अध्यक्ष बनल्याने कर्नाटकात पक्षाला संजीवनी मिळाल्याचं पाहायला मिळालं. खर्गे हे 9 वेळा कर्नाटकचे आमदार राहिले असून त्यांचा येथील राजकारणात विशेष प्रभाव आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण पक्षाने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि पक्षाने कर्नाटकात सत्ता काबीज केली आहे. खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसला दुसऱ्या राज्यात सत्ता मिळाली आहे.
▶️जुन्या व स्थानिक निष्ठावंत नेत्यांना डावलल्याचा भाजपला फटका?;
जुन्या निष्ठावंत स्थानिक नेत्यांना डावलल्याचा किंवा त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून येत आहे.आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीही हा इशारा असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला यातून धडा घ्यावा लागणार आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑगस्ट :- दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक 10 ऑगस्ट : देवाग कोष्टी समाज पुणे या संस्थेच्या विश्वस्तपदाचा मागील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…