Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

१८ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरण केंद्रांवर लागल्या रांगा ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जून) : राज्यात २२ जून पासून १८ वर्षांवरील नागरिकांना करोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. महाराष्ट्र करोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

तर, केंद्र सरकारने प्रत्येक भारतीयाचे मोफत लसीकरण करण्यासाठी ‘सर्वासाठी मोफत लसीकरण मोहीम’ सुरू केली आहे. या मोहिमेचा सर्वाधिक लाभ देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुणाईला होईल. आपण सर्वानी लसीकरणाची प्रतिज्ञा करू या. आपण संघटितपणे करोनाचा पराभव करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

Google Ad

लसीकरणातील प्रगती आदी निकषांनुसार लसमात्रा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या मोहिमेत १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर सकाळी सहा वाजल्यापासून नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.

 

आज दि .२५ जून २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ चा वय १८ ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कोविड -१९ च्या ४४ लसीकरण केंद्रावर सकाळी १० .०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल. पिंपळे गुरव येथील महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत आज सकाळी ६ वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे असल्याचे दिसून आले या ठिकाणी आज १८ ते ४४ वयोगटातील २५० लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी, पिंपळे गुरव या केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे.

सर्व वयोगटामधील लाभार्थी यांनी कोविन अॅप वर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या १० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा – या ९० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दर गुरुवारी स्तनदा मातांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील. तसेच कोविन अॅप वर नोंदणी करण्यासाठी आज रात्री ८.०० नंतर स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर सकाळी ८.०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये . असे महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!