Google Ad
Editor Choice

पुरंदरचे विमानतळ पुन्हा चाकण येथे आणा … अभय भोर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ सप्टेंबर) : पुण्यातील नियोजित विमानतळ चाकण परिसरातच व्हावे, अशी चाकण, तळेगाव, रांजणगाव आदी भागातील उद्योजकांची मागणी आहे. चाकणला विमानतळ न झाल्यास या औद्योगिक पटट्यातील उद्योग महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होण्याची भीती इंडस्ट्रीज असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केली आहे.

चाकणला विमानतळ व्हावे, यासाठी शहर व परिसरातील ७० टक्के उद्योजकांचे एकमत आहे. पिंपरी-चिंचवडसह चाकण, रांजणगाव, तळेगाव हा पट्टा ‘ऑटोमोबाईल हब’ म्हणून ओळखला जातो. या भागात जवळपास ४० ते ५० हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. चाकणला विमानतळ होणार म्हणून अनेक मोठ्या कंपन्यांनी या भागात गुंतवणूक केली. अनेकांनी उद्योगही सुरू केले.

Google Ad

पुण्याचे नियोजित विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करण्याची मागणी ‘ फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ‘ या उद्योजकांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे . औद्योगिक पट्टा असल्याने चाकण परिसरात विमानतळ झाल्यास अनेक परदेशी कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येतील , असा दावा या संघटनेने केला आहे . फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे .

चाकणलगत तळेगाव , रांजणगाव , पिंपरी चिंचवड आदी भागांत औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात आहेत . तळेगाव – चाकण हे अंतर १५ मिनिटांवर आहे . पोषक वातावरण असल्याने चाकणला विमानतळ झाल्यास परदेशी कंपन्या आकर्षित होऊन राज्यातील गुंतवणुकीत भर पडेल . त्याचा उद्योग क्षेत्रालाही फायदा होईल . मुंबई विमानतळाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेक उद्योग येण्यास अनुत्सुक त्यादृष्टीने त्यादृष्टीने आहेत . चाकणला विमानतळ सुरू करण्याबाबत विचार करावा , अशी मागणी भोर यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement