Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मोरवाडी पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दर रविवारची साप्ताहिक पुजेचा ६ वा वर्धापनदिन साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जून) : मोरवाडी पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याची दर रविवारी पुष्पहार अर्पण करून पुजा केली जाते दि.३१ मे २०१५ रोजी पुतळ्यास मेघडंबरी नगरसेविका सौ.आशाताई शेंडगे-धायगुडे , पालिकेतील अधिकारी वर्ग व समाज बांधवच्या पुढाकाराने करण्यात आली श्री दिपक भोजने यांच्या कल्पनेतून समाज बांधव एकत्रित कसे जमा होतील यासाठी त्यांनी दर रविवारी पुण्यश्लोक अहिल्यामातेची पुजा करायची ही कल्पना त्यांनी आपल्या सहकार्य सांगितले त्या सर्वाना पटली दि.६ जुन २०१५ रोजी रविवार या दिवसापासून दर रविवारी अखंडित पुजा होत गेली.

बघताबघता ६ वर्ष पूर्ण झाले करोना काळात सुध्दा शासकीय नियम पाळुन पुजा करण्यात आली या पुजेच्या निमित्ताने विविध उपक्रम सुध्दा राबविण्यात आले ६ व्या वर्धापनदिनानिमित्त विजय भोजने उपअभियंता तथा प्रवक्ता बीआरटीएस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली यावेळी विजय भोजने म्हणाले की हा जो उपक्रम शहरातील समाज बांधवांनी राबवला आहे यांचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे पुजेचे निमित्ताने ज्यास्तीत ज्यास्त समाज बांधव एकत्रित होतील या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी दिपक भोजने व त्याच्या सहकारी यांचे कौतुक केले.

Google Ad

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती व दर रविवारच्या साप्ताहिक पुजेच्या निमित्त आनोखे अभिवादन करण्याचे ठरविले प्रत्येक समाज बांधव शैक्षणिक साहित्य २०० पानी वही व एक पेन भेट करा व इतरांना सांगा जमा झालेल्या शैक्षणिक साहित्य समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे विशेष सहकार्य केल्याबद्दल श्री गणेश एकळ , विजय महानवर , बंडू लोखंडे , राहुल मदने , दादासाहेब कोपनर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दत्ता पाटील महावीर काळे, महादेव देशमुख , संजय कवितके, धनजय गाडे , सुनिल बनसोडे , विभिषण घोडके, दादा खरात , विनोद बरकडे, आशोक महानवर , व इतर समाज बांधव उपस्थित होते श्री दिपक भोजने यांनी सर्वांचे आभार मानले*मानल

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!