पुणे हादरले … पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा खून …क्षणात जीव घेतला!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ ऑक्टोबर) : प्रेम अतिशय निखळ आणि पवित्र अशी भावना आहे. पण कधीकधी याच प्रेमाचे प्रेमाचे रुपांतर सुडामध्ये होते. सध्या असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आलाय. तसा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे. मृत मुलगी इयत्ता आठवी वर्गामध्ये शिकत होती. सोमवारी (12 ऑक्टोबर) संध्याकाळी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ही घटना घडली असून एकच खळबळ उडाली आहे.

▶️मुलगी कबड्डी खेळत असताना कोयता, चाकूने वार

मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कबड्डी खेळत होती. यावेळी आजूबाजूला काही छोटी मुलं तसेच इतन नागरिक व्यायाम करत होते. दरम्यान, मुलगी कबड्डी खेळत असताना तिच्याच नात्यातील एका आरोपीने अन्य दोन व्यक्तींसह तिचा खून केला. तिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स येथे ही घटना घडली.

▶️खुनाचा थरार मुलीच्या मैत्रिणींनी पाहिला

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुलीवर वार करत असताना हा सर्व प्रकार मुलीच्या मैत्रिणींनी व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिला आहे. कसलीही भीती न बाळगता आरोपीने मुलीची हत्या केल्यामुळे या परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

▶️रुग्णालयात दाखल केले, पण तोपर्यंत मृत्यू   

दरम्यान, या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. उपचारासाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

10 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

17 hours ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

1 day ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 day ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago