Categories: Uncategorized

पर्यावरण जागृतीसाठी पुणे ते कन्याकुमारी ‘सायकल वारी’ – सायकलपटू जितीन इंगवले यांची विधायक मोहीम – भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले कौतूक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : आपण प्रगती साधत असताना, आपल्याकडून कळत-नकळत निसर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असताना, झाडांची कत्तल केली जाते. आगामी काळात स्वच्छ हवेचा प्रश्न गंभीर होणार आहे. पर्यावरणाचे सरंक्षण करावे, याची जनजागृती करण्यासाठी सायकलपटू जितीन इंगवले यांनी ‘पुणे ते कान्याकुमारी सायकल मोहिम’ यशस्वी केली.
पिंपरी-चिंचवडमधील सायकलपटू जितीन इंगवले व त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी ‘पर्यावरण’ या संदर्भात जनजागृती व्हावी, या उद्देश्याने दि. १६ ते २५ नोव्हेंबर दरम्यान पुणे ते कन्याकुमारी या सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये त्यांनी १५५० किमीचे अंतर त्यांनी या दहा दिवसात पूर्ण केले. एका दिवसात सुमारे दीडशे किमीचा टप्पा ते रोज पार करत होते. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यातून त्यांनी प्रवास केला.

पहाटे ५ वाजता ते सायकल चालविण्यास सुरुवात करत असत. हा १५० किमीचा टप्पा गाठण्यासाठी रोज किमान १० ते ११ तास त्यांना सायकल चालवावी लागत असे. या मोहिमेत जितीन इंगवले यांच्यासह सुनील अडसूळ, संजय टिळेकर, चंद्रकांत ववले, संतोष दरेकर, संदीप बोडके, विनोद बोडके, गणेश गोरे, आशुतोष देसले, सुमीत पवार, रामदास दरेकर, अनिकेत इंगवले यांच्यासह वाहन सहाय्यक संतोष इंगवले सहभागी झाले होते.

जितीन इंगवले म्हणाले की, या मोहिमेसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही सर्वजन दररोज किमान ३०-४० किमीचा तर आठवड्यातून एक दिवस १०० ते १२० किमी प्रवास करताना या मोहिमेचा सराव केला. यामुळेच ही अवघड मोहिम पूर्ण करण्यात आम्ही सर्वजन यशस्वी झालो आहोत.

सायकलपटू जितीन इंगवले आणि त्यांच्या ११ सहकाऱ्यांनी पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी एवढी मोठी मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली याबाबत त्यांचे मनापासून अभिनंदन. मनाचा निग्रह आणि सरावातील सातत्य या दोन गोष्टींच्या जोरावर एवढी मोठी मोहीम पूर्ण करण्यात या सर्वांना यश मिळाले आहे. या मोहिमेतून त्यांनी ‘पर्यावरण वाचविण्याचा’ संदेश देखील महत्वपूर्ण आहे.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर … अशी असणार प्रभाग रचना

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22ऑगस्ट :- पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याकरीता आणि हरकती…

1 day ago

यमुनानगर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम आयोजित मंगळागौर कार्यक्रमात महिलांनी केली धमाल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22ऑगस्ट : केशवराव ठाकरे स्टेडियम यमुनानगर येथे सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती…

1 day ago

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब चिंचवडमध्ये पारंपरिक जल्लोषात संपन्न भव्य सोहळा

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21…

2 days ago

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५ … उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 21 ऑगस्ट -- उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्का देण्यासाठी…

2 days ago