Pune : पुण्यातील बिबवेवडीत मध्यरात्री खुनाचा ‘ थरार ‘ … १० जणांच्या टोळक्याकडून सराईत गुन्हेगार ‘ माधव’चा सपासप वार करून ‘ मर्डर ‘ ;

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १५ मे) : बिबवेवाडीत मध्यरात्री सराईत गुन्हेगाराचा टोळक्याने सपासप वार करत खून केल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. मात्र, शहरात दिवसभर कडक लॉकडाऊनची कारवाई सुरू असताना मध्यरात्री टोळक्याचा धुडगूस सुरूच असल्याचे दिसत आहे.

माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. सहकारनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात 10 जणांच्या टोळक्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरम्यान, मध्यरात्री माधव याचा मित्र सुनील खाटपे याने फोनकरून माझे भांडण झाले आहे.

मी बिबवेवाडी येथील ओटा स्कीमजवळ असल्याची माहिती दिली. त्यामुळे माधव आणि यातील फिर्यादी सिद्धार्थ पालांगे हे दोघे दीड वाजण्याच्या सुमारास येथे आले. ते येथील चौकात सुनील याची वाट पाहत असताना अचानक दहा जणांचे टोळके हातात लोखंडी रॉड, बांबू व ट्यूब लाईट सारखे हत्यारे घेऊन आले. त्यांनी माधव याला शिवीगाळ करत त्याच्या तोंडावर आणि डोक्यात बेदम मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर हे टोळके पसार झाले आहे. दरम्यान, नेमका हा खून का झाला हे समजू शकलेले नाही. मात्र, फक्त मित्राच्या सांगण्यावरून तो गेल्यानंतर हा प्रकार घडला आहे. तो मित्र देखील पसार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

9 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

1 day ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago