Google Ad
Editor Choice Health & Fitness Pune

Pune : सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार … तर मग काय आहे, अडचण ? … वाचा सविस्तर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१मे) : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी पुणे महापालिकेनं सीरम इन्स्टिट्यूटकडे लसीच्या पुरवठ्याची मागणी केलीय. सीरमकडूनही पुणे महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पुणे महापालिकेला लस मिळू शकणार नाही. अशावेळी केंद्र सरकारची परवानगी का मिळत नाही? असा प्रश्न विचारला जातोय …

सीरम इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, लसीसाठी पुणे महापालिकेला केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. तसं पत्र सीरम इन्स्टिट्यूटकडून पुणे महापालिकेला देण्यात आलंय. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळावी यासाठी पुणे महापालिका गेल्या 3 आठवड्यापासून पाठपुरावा करत आहे. अशावेळी सीरमने परवानगी दिली आहे. पण केंद्र सरकार परवानगी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Google Ad

सिरम इन्स्टिट्युटची पुण्याला लस देण्याची तयारी आहे. पण त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती. तसेच यासंदर्भात मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि आयुक्त विक्रम कुमार यांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट देऊन येथील अधिकार्‍यांशी चर्चा केल्याचे बोललं जात आहे. यावेळी पुण्याला लस देण्याचा आग्रही मागणी करण्यात आली.

सीरम इन्स्टिट्यूटकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर पुणे महापालिकेनं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटकडून लसीच्या खरेदीची परवानगी मिळावी अशी मागणी महापालिकेकडून करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका दोन दिवसांत जागतिक निविदा काढणार असल्याची माहितीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलीय.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!