Google Ad
Editor Choice

पुणे ग्रामीणच्या महिला पोलीस आजपासून ‘ऑन ड्युटी 8 तास’!

महाराष्ट्र 4 न्यूज, (दि.३१ऑगस्ट) : पोलिसाची नोकरी म्हटली की त्याला वेळेचं बंधन नाही. अनेकदा बंदोबस्त, सण-उत्सव यांच्यावेळेस पोलिसांना घड्याळाकडे न पाहाता आपलं कर्तव्य बजावावं लागतं. ज्यादा तास काम करण्याचा पोलिसांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौंटुबिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यात महिला पोलिसांना तर ज्यादा तास काम करावं लागत असल्याने कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) महिला पोलिसांच्या कामाचे तास 12 वरून 8 तास करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा पुणे ग्रामीण दलात कर्तव्य बजावणाऱ्या सुमारे साडेतीनशे महिला पोलिसांना लाभ होणार आहे.

▶️कर्तव्यावर आणि आरोग्यावर परिणाम

Google Ad

पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना सण, उत्सव, बंदोबस्त, गंभीर गुन्हे या निमित्ताने वर्षभरातून अनेकवेळा ज्यादा तास कर्तव्य बजवावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदारीवर त्याचा परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे. यासोबतच त्यांच्या कर्तव्यावर आणि आरोग्यावरही याता परिणाम होत आहे.

▶️आजपासून निर्णयाची अंमलबजावणी

याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस दलातील महिला पोलिसांना येणाऱ्या अडचणींचा सहानभुतीपूर्वक विचार करत त्यांना 12 तासांऐवजी 8 तास कर्तव्य बजावण्यास सांगावे, असा आदेश दिला होता. त्या आदेशानुसार, ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!