Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : प्रवासी महिलेची जबरदस्तीने बॅग हिसकवणारा रिक्षा चालक … युनिट-१, गुन्हे शाखा , पुणे शहर यांचेकडून जेरबंद!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ जुलै) : दिनांक २१ जून २०२१ रोजी दुपारी ०४.४५ वा . सुमारास गोकुळनगर डॉमिनोज पिझ्झा कोंढवा पुणे येथे शिवानी राहुल मेमाणे वय ३५ वर्षे रा . कात्रज कोंढवा रोड गोकुळनगर लेन नं ५ दिवाणी सोसायटी मागे पुणे ही महिला रिक्षा क्रमांक एमएच / १२ / ईएफ / ७५१८ हिचे मधुन आली असताना रिक्षाच्या भाडे वरुन वाद झाल्याने रिक्षा चालकाने सदर महिलेची पर्स जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेली होती . त्याबाबत कोंढवा पोलीस ठाणे गुरनं ४८७/२०२१ भादवि कलम ३ ९ २ अन्वये रिक्षा चालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हा दाखल झाले पासुन आरोपी पोलीसांना गुंगारा देत होता . युनिट १ कडील अधिकारी व कर्मचारी पुणे शहरात घडलेले जबरी चोरीच्या गुन्हयांची माहिती घेण्याचे काम करीत होते . सदर रिक्षा क्रमांक वरुन रिक्षा मालकाची पुर्ण माहिती घेवुन त्यावरील चालकाची माहिती घेत असताना सदर रिक्षावर राहुल भोडणे हा चालक असले बाबत माहिती मिळाली गुन्हा घडले पासुन सदर रिक्षा चालक हा वारंवार कामाची ठिकाणे व त्याच्या राहण्याची ठिकाणे बदलत होता दि .२ ९ / ०१ / २०२१ रोजी युनिट -१ , गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट -१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करिता असताना पोलीस अंमलदार अमोल पवार व इम्रान शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंढवा परिसरात महिला प्रवाश्याला लुटणारा रिक्षा चालक हा पहिले भाडयाचे घर सोडुन गेला आहे.

Google Ad

त्यानंतर त्याने म्हसोबा मंदीराजवळील टिळेकरनगर येथे गल्लीत दुसरे घर भाडयाने घेऊन राहत आहे त्याचे घराबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच बातमी वपोनि शैलेश संखे यांना कळवली त्याप्रमाणे युनिट १ कडील अधिकारी व स्टाफ असे मिळालेल्या बातमीप्रमाणे ठिकाणी जावुन खात्री करुन त्यास १२.१० वा सुमारास ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राहुल प्रकाश भोडणे वय २९ वर्षे रा . म्हसोबा मंदीराजवळ टिळेकरनगर कोंढवा पुणे त्याचेकडे सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपास करीत असताना

त्याने कोंढवा पोलीस ठाणे गुरनं ४८७/२०२१ भादवि कलम ३ ९ २ हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडे गुन्हयात वापरलेल्या रिक्षाबाबत तपास केला असता गुन्हा केल्यानंतर सदर रिक्षा त्याने म्हसोबा मंदीराजवळ टिळेकरनगर येथे लपवुन ठेवली आहे असे सांगितली सदर आरोपीस स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन रिक्षा पार्क ठिकाणी आलो असता सदर ठिकाणी रिक्षा क्रमांक एमएच / १२ / ईएफ / ७५१८ हि म्हसोबा मंदीराजवळ टिळेकरनगर कोंढवा येथे मिळुन आल्याने ती दोन पंचासमक्ष किंमत रुपये ५०,००० / – ची रिक्षा सविस्तर पंचनामा करुन पुराव्याकामी जप्त करण्यात आली आहे . कोंढवा पोलीस ठाणे गुरनं ४८७/२०२१ भादवि कलम ३ ९ २ हा गुन्हा उघड झाल्याने आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे .

सदरची कामगिरी मा . अपर पोलीस आयुक्त , गुन्हे श्री अशोक मोराळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री श्रीनिवास घाडगे , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे -१ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार , इम्रान शेख , अजय थोरात , तुषार माळवदकर , महेश बामगुडे , विजेसिंग वसावे , अय्याज दड्डीकर यांनी केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!