Pune : येरवडा जेलमध्ये धुवायला लावले कपडे … बाहेर पडताच घेतला बदला … पुरंदरमध्ये तरुणाचा निघृण खून

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला आपले कपडे धुवायला लावल्याचा बदला बाहेर येताच घेतला. येरवडा कारागृहात पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला लावणे अशी कामे सांगितल्याचा राग कैद्याच्या मनात होता. कारगृहातून बाहेर येताच त्याने पुरंदरमधील एकचा निर्घृण खून करुन मृतदेह सातारा जिल्ह्याच्या हद्दीत टाकला. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

मंगेश सुरेंद्र पोम (वय-35 रा. पोमणनगर, ता. पुरंदर) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर वैभव सुभाष जगताप (वय-28 रा. पांगारे, ता. पुरंदर) याला लोणंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याचा साथीदार ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. वैभव आणि ऋषीकेश या दोघांनी मिळून मंगेशचा खून केला.

मयत मंगेश पोम हा काही दिवसांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यात पुण्यातील येरवडा कारगृहात शिक्षा भोगत होता. तर आरोपी वैभव हा देखील एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगायला येरवडा कारागृहात आला होता. याच दरम्यान मयत मंगेश याने वैभवला पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला लावणे अशी कामे लावली होती. याचा राग वैभवला आला होता. हे दोघे शिक्षा भोगून बाहेर आले होते. खून करुन मृतदेह टाकला सातारा हद्दीत शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आरोपी वैभव याने साथिदार ऋषीकेशच्या मदतीने मंगेशचा निर्घृण खून केला.

यानंतर त्याचा मृतदेह खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक गावच्या हद्दीत टाकला. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन आरोपी वैभवला अटक केली आहे. दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

10 hours ago

दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व ज्यूनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…

15 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

3 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

7 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

1 week ago