Google Ad
Editor Choice Pune

पुणे महापालिका निवडणूक … राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपची काय, आहे मागणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११जून) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तस तिसऱ्या लाटेची शक्यताही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशास्थितीत पुण्यात मात्र महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताना पाहायला मिळतेय. 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. मात्र, आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेनेकडून जागाचं गणित मांडण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेवर स्वबळावर झेंडा फडकवण्याचा निर्धार केलाय, तर भाजपनं खासदार गिरीश बापटांवर जबाबदारी सोपवल्याचं पाहायला मिळतंय.

मुंबईनंतर पुणे महापालिका सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार असली तरी आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर जागांचं गणितच मांडलं आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली तरी शिवसेना 80 जागांवर लढेल, अशी घोषणा संजय राऊत यांनी आठवडाभरापूर्वी केली. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Google Ad

दुसरीकडे सत्ताधारी भाजपनेही महापालिका निवडणुकीसाठी आता कंबर कसली आहे. महापालिका निवडणूक ही खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जातील, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर त्यांनी नगरसेवकांनाही कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे दीड वर्ष वाया गेलं आहे. कोरोना आधी तीन वर्ष नगरसेवकांना काम करण्यासाठी चांगली संधी मिळाली होती. आता फक्त सहा महिनेच उरले आहेत. त्यामुळे खुर्ची टाकून बसा. हातात काठी घेऊन काम करा. तरच सत्तेत याल, असे आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत 2022 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत असेल असं अनेक जाणकार सांगतात. त्यामुळे शिवसेना आणि भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसनंही महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. येत्या महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवणार, असा निर्धार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केलाय. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे 2022 मधील पुणे महापालिका निवडणूक अधिक रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालंय.

▶️पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

भाजप – ९९
राष्ट्रवादी – ४२
काँग्रेस – १०
सेना – १०
मनसे – २
एमआयएम – १
एकूण जागा – १६४

Google Ad

About the author

Maharashtra14 News

34 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!