Google Ad
Editor Choice

पुणे- लोणावळा लोकल चालू व लोकल फेऱ्या वाढविण्याबाबत डी.आर.एम.रेणू शर्मा यांच्याशी सकारात्मक चर्चा ….. विशाल वाळुंजकर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ऑगस्ट) : आज दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी पुणे डिव्हिजन रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा यांच्याशी रेल्वेच्या विविध समस्यांबाबत भेट घेण्यात आली.. यावेळी दापोडी रेल्वे स्टेशनवर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे व रेल्वे पोलीस कर्मचारी नेमणूक केल्याबाबत डी. आर. एम.रेणू शर्मा व रेल्वे प्रशासनाचे आभार व अभिनंदन व्यक्त करण्यात आले.

यावेळी डी. आर .एम. रेणू शर्मा भेटीच्या चर्चेदरम्यान पुणे लोणावळा हे पर्यटन, शिक्षण, व्यवसाय ,उद्योजक ,दूध व्यवसाय करणारे इतर सर्व क्षेत्रातील दोन डोस पूर्ण असलेल्या प्रवाशांना पुणे लोणावळा लोकल प्रवास चालू करण्यात यावी व रेल्वे स्थानकावर कोरोना ऑंटी रॅपिड टेस्ट व व्हॅक्सिनेशन चालू करण्याची मागणी पुणे रेल्वे बोर्ड सदस्य विशाल वाळुंजकर यांच्या कडून करण्यात आली….

Google Ad

या भेटीप्रसंगी रेणू शर्मा यांनी पुणे लोणावळा लोकल सध्या दोन फेऱ्या अपडाऊन मध्ये चालू आहेत, ते दोन डोस पूर्ण असलेल्या प्रवाशांना वाढत्या मागणीनुसार लोकल फेऱ्या वाढविण्यात येईल असे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर कोरोना अँटी रॅपिड टेस्ट आणि व्हॅक्सिनेशन स्थानिक मनपा प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य मिळाल्यास चालू करण्यात येतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.. त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन वरील स्वच्छता, महिला सुरक्षा विषयी रेणू शर्मा यांच्याशी चर्चा करण्यात आली.. या वेळी सोशल मीडिया सेलचे सहसंयोजक सुधीर चव्हाण ,धर्मेंद्र शिरसागर ,विशाल सातपुते, राजू कानडे यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

86 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!