Google Ad
Editor Choice

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी रुग्णालयात जाऊन घेतली आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ एप्रिल) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड शहरातील विविध ठिकाणी केले जाणार होते. पण, आपले एकेकाळचे खंदे समर्थक व आताचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती मिळताच अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उद्घाटनाचे कार्यक्रम रद्द केले. कार्यक्रम रद्द करून अजित पवार यांनी पुण्यातील बाणेर येथील खाजगी रुग्णालयात जाऊन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. १६,शनिवार) खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, आणि आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप, विजूशेठ जगताप यांच्याशी चर्चा करून धीर दिला, तसेच रुग्णालयातील डॉक्टरांकडून सर्व माहिती घेतली.

Google Ad

यावेळी अजित पवार यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल यावेळी उपस्थित होते. आमदार लक्ष्मण जगताप आणि अजित पवार यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले. त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी जरी पक्ष बदलला तरी त्यांचे संबंध अजूनही कायम आहेत. आपला एकेकाळचा खंदा समर्थक आजारी आहे, हे समजताच अजितदादांनी आपले पिंपरी चिंचवड शहरातील सर्व कार्यक्रम रद्द करून थेट रुग्णालयात जाऊन जगताप यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत असून ते उपचारास योग्य प्रतिसाद देत असल्याचे सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!