Google Ad
Editor Choice

Pune : धक्कादायक … पुण्यातल्या नगरसेवकांनी केली गेल्या चार वर्षांत कापडी पिशव्यांसाठी तब्बल 11 कोटींची उधळपट्टी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२सप्टेंबर) : पुणे महापालिका निवडणुकीचे पडघम लवकरच वाजण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांकडून आपापल्या वॉर्डातल्या मतदारांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशात पुण्यातल्या नगरसेवकांनी गेल्या चार वर्षांत तब्बल 11 कोटी 57 लाख रुपये हे केवळ ज्युट आणि कापडी पिशव्या वाटप करण्यावर खर्च केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. पुण्यातील परिवर्तन संस्थेने पुणे महानगरपालिकेतील 162 नगरसेवकांचा मागील चार वर्षाच्या कामाचा लेखाजोखा घेत त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये नगरसेवकांनी केलेल्या विविध कामांचा उल्लेख करण्यात आला आहे.

▶️11 कोटी 57 लाख रुपयांच्या कापडी पिशव्यांचं वाटप

Google Ad

पुणे महानगरपालिकेतल्या नगरसेवकांकडून आपापल्या वॉर्ड आणि प्रभागामध्ये नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यामध्ये सामाजिक उपक्रमांबरोबर अनेकदा संसारोपयोगी साहित्यही वाटलं जातं. अशाच उपक्रमांमधून पुण्याच्या 162 नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डात कापडी आणि ज्यूटच्या पिशव्यांचं वाटप केलेलं आहे. या पिशव्यांवर नगरसेवकांनी तब्बल 11 कोटी 57 लाख 30 हजार 999 रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे.

अनेकदा गरज नसताना अशा संकल्पनांवर कोट्यवधींची उधळण होण्याची शक्यता असते. त्यामुळे खर्चासाठी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी सामाजिक संघटनांकडून सातत्याने होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!