Google Ad
Editor Choice Maharashtra

Pune : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा … आम्ही जातो, आमच्या … वाचा, काय म्हणाले?

महाराष्ट्र 14 न्यूज : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटलांवर विरोधी नेते अनेकवेळा पुण्यातून निवडणुक लढवली म्हणून पाटलांवर निशाणा साधतात. पुण्यात अटल संस्कृती गौरव पुरस्काराच्या वितरण सोहळ्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाटलांनी पुण्यातून विधानसभा निवडणुक लढवली असं म्हणत पाटलांना नेहमी हिणवलं जातं. मात्र पुण्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून नाही तर पक्षाने आदेश दिल्यामुळे आपण निवडणुक लढवली असल्याचं पाटील यांनी सांगितलं होतं. दरम्यान, चंद्रकांत पाटील आता आपण पुण्याल जाणार हे बोलले त्यामुळे यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Google Ad

खासदार गिरीश बापट भाषण करताना म्हणाले की “जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार आहेत की, त्या व्यक्तीचा आणि पुण्याचं कनेक्शन कसे हे लगेच जोडतात.” अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. जो बायडेन राष्ट्रपती झाले. तर लगेच एका पुण्याच्या व्यक्तीने जोडले राष्ट्रपती जो बायडेन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे होते.अहो इंदिरा गांधी पुण्याच्या हुजुरपागा शाळेत शिकल्या आणि बर का देवेंद्र तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कारण तुमचे काका पुण्याचे असे म्हणताच सभागृहात एकच पिकला

.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

126 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!