Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय … राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची टीका

महाराष्ट्र 14 न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे देशातील अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यातीच पुनरावृत्ती पुणे भाजप करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. पंतप्रधानांचाच वारसा जपत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रॉपर्टी विकण्याचा सपाटा लावल्याचा आरोप जगताप यांनी केलाय.

जगताप यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कारभारावर टीका करताना आगामी निवडणुकीत पुणे महापालिकेलीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा दावा केला आहे. गोरगरीबांचे नाव पुढे करून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर हे एकप्रकारे इस्टेट एजंट असल्याप्रमाणेच काम करत असल्याची टीका जगताप यांनी केलीय. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या मर्जीनेच हा कारभार सुरू असल्याची शक्यताही जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Google Ad

200 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्यासाठी म्हणून महानगरपालिकेच्या मालकीच्या 1 हजार 260 फ्लॅट विक्रीचा निर्णय घेण्यात आलाय. गरिबांना फ्लॅट देण्याच्या आडून सत्ताधारी भाजपचा हा सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा प्रयत्न आहे, असा आरोप जगतापांनी केलाय. पुणेकरांची फसवणूक करण्याचा भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशाराही जगताप यांनी दिलाय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

169 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!