Google Ad
Editor Choice Pune

पुणे बनले राज्यातील सर्वात मोठे शहर … २३ गावांचा समावेश, अधिसूचना जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०जून) : पुणे शहर महापालिका हद्दीलगतच्या 23 गावांच्या समावेशाची अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या निर्णयामुळे पुणे हे राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावांचा समावेश महत्वपूर्ण ठरणार आहे.

माहापालिकेत 23 गावांच्या समावेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही होते. राज्य शासनाने गतवर्षी 24 डिसेंबर रोजी 23 गावांच्या समावेशाची अधिसूचना काढली आहे. त्यावर हरकती-सूचना मागविण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावर जवळपास साडेचारशे हरकती आल्या होत्या. या हरकती-सूचनांवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांनी त्यांचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला होता.

Google Ad

त्यावर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत गावांचा समावेशाचा निर्णय निश्चित करण्यात आला. त्यानुसार आज बुधवारी नगरविकास खात्याने गावांच्या समावेशाचे आदेश काढले आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता लवकरच सुरुवात होणार आहे. किती सदस्यांचा प्रभाग करायचा, यासंबंधीचा निर्णय झाल्यानंतर प्रभागरचना करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी आधी 23 गावांचा समावेश महापालिकेत होणे गरजेचे होते. त्यामुळेच आता गावांची समावेशाचा निर्णय घेतला असल्याचे स्पस्ट होत आहे.

या गावांचा होणार समावेश
म्हाळुंगे, सूस, बावधन (बुद्रुक), किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी (बु.), नर्‍हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

22 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!