Google Ad
Editor Choice

जनतेची दुवा आणि डॉक्टरांची दवा ने प्रकृतीत सुधारणा — देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ एप्रिल) : चिंचवडचे भाजप (BJP) आमदार आणि पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराचे माजी अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचे भाऊ लक्ष्मण जगताप हे बाणेर येथील खासगी रुग्णालयात बारा दिवस झाले उपचार घेत आहेत.

आज (दि.२४ एप्रिल) दुपारी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा बाणेर येथील रुग्णालयात आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेतली, यावेळी लक्ष्मण जगताप हे उठून स्वतः त्यांच्याशी बोलले, त्यावेळी फडणवीस यांनी त्यांना धीर दिला, यावेळी फडणवीस यांनी संबंधित उपचार करणाऱ्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृती विषयी माहिती घेतली.

Google Ad

जनतेची दुवा आणि डॉक्टरांच्या दवा ने तुमचे सर्वांचे लाडके भाऊ शहरवासीयांची सेवा करण्यासाठी पुन्हा लवकरच रुजू होतील असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बंधू शंकर जगताप आणि विजय जगताप व कुटूंबियांना धीर देताना सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!