Categories: Uncategorized

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात जनजागृती … १३ डिसेंबर रोजी पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक व प्राथमिक शाळा पिंपळे गुरव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १२ डिसेंबर २०२३ : भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या  विकसित भारत संकल्प यात्रेला पिंपरी चिंचवड शहरात चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत १२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना या माध्यमातून विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असून अशाप्रकारे थेट लाभ मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात २८ नोव्हेंबर पासून विकसित भारत संकल्प यात्रा सुरु झाली आहे. शहरातील विविध ठिकाणी या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. चित्ररथाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफितीद्वारे दिली जात आहे.  महापालिकेच्यावतीने शहराच्या प्रमुख ६७ ठिकाणी या यात्रेनिमित्त जनजागृती करण्यात येणार असून यामध्ये प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनाआयुष्मान भारत कार्डआधार कार्ड अद्यावतीकरणउज्ज्वला गॅस योजनेची माहिती आणि  लाभ देण्यासोबत आरोग्य शिबीराचे आयोजन केले जात आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेत लोकप्रतिनिधींसह विविध  संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभाग घेत असून नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग या कार्यक्रमाला मिळत आहे.  १२ डिसेंबरपर्यंत शहरातील १५ ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला आहे. सर्व सामान्य नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ देणे तसेच विविध योजनांची माहिती चित्रफीत आणि हस्तपत्रकाच्या माध्यमातून दिली जात आहे. योजनांबद्दल आणि मिळालेल्या लाभाबद्दल नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

पुढील सात  दिवसांत पिंपरी चिंचवड शहरातील  सृष्टी चौक व प्राथमिक शाळा पिंपळे गुरवडॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन व ओम हॉस्पीटल मागील परिसर भोसरीशितलबाग,  पीएमटी चौक व अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरीधर्मवीर संभाजी चौक व बैलगाडा घाट च-होलीमहात्मा फुले प्राथमिक शाळा आकुर्डीलुम्बीनी बुध्द विहार बोपखेल,  प्राथमिक शाळा चिखली व म्हेत्रे वस्तीबहुउददेशीय सभागृह पुर्णानगरसांस्कृतिक केंद्र शिवतेज नगरप्राथमिक शाळा रुपी नगर व तळवडेठाकरे मैदान यमुनानगरसदगुरु उद्यान निगडीज्येष्ठ नागरिक हॉल माळीअळी व जय भारत तरुण मंडळ हॉल पिंपरीबळीराज मंगल कार्यालय रहाटणीतापकीर चौक काळेवाडी यशवंतराव चव्हाण शाळा मैदान थेरगाव या ठिकाणी ही यात्रा भेट देईल.

नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या विविध कक्षांना भेट देऊन योजनांची माहिती जाणून घेवून योजनांचा लाभ घ्यावाअसे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

3 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

1 month ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago