Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं. चिं. शहरातील भक्ती शक्ती चौकातील निगडी येथील … प्रशस्त  उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि रोटरी पुलाचे उद्घाटन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ ऑगस्ट २०२१) :   भक्ती शक्ती चौकातील निगडी येथील प्रशस्त  उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि रोटरी पूल हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या कल्पकतेचा अविष्कार असून शहरात प्रवेश करणाऱ्यांना यामधून शहराच्या विकासाची अनोखी ओळख होईल असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.

     
महानगरपालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे ग्रेड सेपरेटर आणि रोटरी पुलाचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

Google Ad

या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, म.न.से. गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या शैलजा मोरे, सुमन पवळे, कमल घोलप, माजी नगरसदस्या अश्विनी चिखले, महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, स्वीकृत सदस्य विभीषण चौधरी, शहर अभियंता राजन पाटील, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, ज्ञानदेव जुंधारे, बापू गायकवाड, विजय भोजने, शशिकांत मोरे,उप अभियंता सुनील पवार,रविंद्र सूर्यवंशी, सुरक्षा अधिकारी सुनिल चौधरी,माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

मनपा हद्दीतील निगडी येथे भक्ती शक्ती चौक ,जुना मुंबई पुणे रस्ता व प्राधिकरणाचा स्पाईन रस्ता एकत्र येत असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत होती.सध्या भक्ती शक्ती ते मुकाई चौक हा बीआरटीएस रस्ता विकसीत करणेत येत आहे. यासाठी कोठेही अपघात होणार नाही याची दक्षता घेऊन भक्ती शक्ती शिल्प समूह चौक हा  सिग्नल फ्री करणेत आलेला आहे. त्याचबरोबर चौकातील प्रत्येक दिशेला जाणारे वाहन सम गतीने फिरते राहून त्यामार्गाने चौक ओलांडण्याचे नियोजन केलेले आहे. चौकाजवळच असणा-या शहराचा मानबिंदू असणारे भक्ती शक्ती शिल्प समुहाच्या सौदर्यात कुठेही कमी होणार नाही याची पूरूपूर दक्षता घेतलेली आहे.

नियोजित उड्डाणपूलाचे क्रॅश बॅरिअर हे भक्ती शक्ती शिल्पाचे तळाशी समपातळीमध्ये ठेवणेत आलेले असून बसमधील प्रवाशांना देखील पुलावरुन  संपूर्ण शिल्पाचे दर्शन होणार आहे. तसेच सदर चौकामधुन पादचा-यांना कुठेही वाहनांचा अडथळा होणार नाही यासाठी खास नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे पुलाचे आराखड्यामध्ये भविष्यातील मोनो रेल, ट्राम या करीता देखील स्पाईन रस्त्याला समांतर अशी ११.०० मी रूंदीची जागा राखीव ठेवणेत आलेली आहे.

भक्ती शक्ती चौकामध्ये तीन लेव्हल मध्ये बांधकाम करणेत आलेले आहे
१) ग्रेड सेपरेटर–स्पाईन रस्त्याला समांतर,
येणा-या व जाणा-या वाहनांसाठी स्वतंत्र लेन,
प्राधिकरण ते मोशी दक्षिण-उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडले जाणार,
लांबी – ४२०मी.,
रुंदी -२७.०० (७.०० मी. रुंद २ लेन प्रत्येकी),
उंची – ५.५० मी.
उच्च क्षमता द्रुतगती मार्गासाठी ११.०० मी. राखीव.
नाशिक महामार्गाकडून देहूरोड कात्रज बाहयवळण मार्गाकडे जाणारी जड वाहने. ग्रेड सेपरेटर मधून जाण्याची व्यवस्था केलेली आहे.

२) रोटरी (वर्तुळाकार रस्ता)
 सध्याचे वाहतूक बेटाचे जागेवर परंतु आकारने मोठे.
 व्यास – ६० मी., रुंदी – १५.५ मी. (३ लेन).
 रोटरीमुळे पादचा-यांना चौकाचे कोणत्याही दिशेने ये-जा करणे शक्य.
 जवळच भक्ती शक्ती चौक असल्याने पर्यटकाची गर्दी होत असल्याने पदचा-यांना याचा चांगला फायदा होणार आहे.
 शिवाय चौक सिग्नल फ्री असल्याने पादचारी व वाहने यांना थांबावे लागणार नाही.
 यामुळे वाहनांचे इंधनामध्ये व वाहनचालकांचे वेळेमध्ये बचत होणार आहे.
 बीआरटी बस सेवेची वारंवारता कायम राखणेस मदत होणार आहे.

३) उड्डाणपूल –
 पुणे मुंबई हम रस्त्याला समांतर,
 पुणे गेट हॉटेल ते कृष्णा मंदीरापर्यत जाणा-या व येणा-या वाहनांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र पूल.
 प्रत्येक पुलाची लांबी – ८४९ मी. रुंदी- १७.२ मी (२ लेन) , उंची – ८.५ मी.
 प्राधिकरणाकडुन पुणे भोसरी व मुंबईकडे जाण्यासाठी प्राधिकरण हद्दीमधुन स्वतंत्र पूल.
 लांबी ३४० मी. रूंदी ८.५ मी. (२ लेन) व उंची ५.५ मी.
  या कामासाठी स्थापत्य विषयक काम करणेसाठी सुमारे र.रु. ७२.४० कोटी व सेवा वाहिन्या स्थलांतरीत करणेसाठी र.रु. १८.१३ कोटी असा एकूण ९०.५३ कोटी खर्च आलेलाआहे.

पुलाचे काम मे. बी. जी. शिर्के कन्स्ट्रकशन टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांनी केले असून या कामाचे सल्लागार मे.स्तुप कन्सलटंटस् प्रा.लि. हे आहेत अशी माहिती शहर अभियंता राजन पाटील आणि सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी आज दिली.

महापौर माई ढोरे म्हणाल्या पुणे मुंबई रस्त्याला समांतर अशा या उड्डाणपूलाखालुन बीआरटी टर्मिनल व पीएमपीएमएलच्या डेपोकडून सर्व बसेस सहज धावणार आहेत. या उड्डाणपुलामुळे शहराचे सौदर्यामध्ये निश्चितच भर पडणार असुन नाशिक फाटा उड्डाणपुलाप्रमाणे हा प्रकल्प शहराचा अजून एक मानबिंदू होणार आहे असे सांगून त्यांनी या प्रकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले.

या वेळी महापालिकेचे शहर अभियंता राजन पाटील,  बीआरटीस विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, ज्ञानदेव जुंधारे, बापू गायकवाड, शशिकांत मोरे, विजय भोजने, सुनिल पवार, रवींद्र सुर्यवंशी या अभियंत्यांचा तसेच सुरक्षा अधिकारी सुनिल चौधरी यांचा महापौर माई ढोरे आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  तसेच हा प्रकल्प उभारणी बाबत बी.जी.शिर्के कंपनीचे अधिकारी, त्यांचे सल्लागार, यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसे गटनेते सचिन चिखले यांनी तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी आणि आभार प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

154 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!