पिं. चिं. महानगरपालिकेचा पैसा व्यर्थ घालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा … जनतेची होणारी लूट थांबवा … माजी खासदार गजानन बाबर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५जून) : मानवी जीवन धोक्यात आणणाऱ्या तसेच जलपर्णी काढण्यावर महानगरपालिकेचा रुपये 4,85,22,470 इतका  पैसा व्यर्थ घालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा. जनतेची होणारी लूट थांबवा अशी मागणी करणारे निवेदन माजी खासदार गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील तसेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव यांना दिले आहे.

या निवेदनात गजानन बाबर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आपणास विनंती करू इच्छितो की, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर सण 2020 मध्येच फौजदारी खटला दाखल झालेला आहे, असे असतानाही बायोमेडिकल वेस्ट चे प्रदूषण असेल तसेच जलपर्णी द्वारे प्रदूषण असेल अजून संपुष्टात आले नाही ही खुप खेदजनक बाब आहे तरी पुढील प्रश्नांची उत्तरे आपण द्यावीत .

▶️असे विचारले प्रश्न :

1) आजपर्यंत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जलपर्णी काढण्यावर महानगरपालिकेचा रुपये 4,85,22,470 इतका पैसा व्यर्थ घालवला आहे तरी जलपर्णी कशामुळे वाढते याचा आपण अभ्यास केला आहे का?? अभ्यास केला असेल तर उपाययोजना आतापर्यंत का केली नाही.

2) जलपर्णी वाढू नये याकरता पर्यावरण विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या तसेच त्यांनी पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्गदर्शन घेतले आहे का, घेतले नसेल तर एवढे शास्त्रज्ञ पर्यावरण विभागात असून आपण मार्गदर्शन का घेतले नाही? तसेच आपला पर्यावरण विभाग काय काम करतो??

3) जवळपास पावणे पाच कोटी रुपये खर्चाला जवाबदार कोण??

4) अपुरे ड्रेनेज नेटवर्क हे यास कारण आहे का?? असल्यास आपण आत्तापर्यंत संपूर्ण ड्रेनेज नेटवर्क का केले नाही?

5) जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून सजीव सृष्टी नष्ट होत आहे यास अधिकारीवर्ग जवाबदार नाही का? तसेच सभोवतालच्या  मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे यास आपले अधिकारी जबाबदार नाहीत का ?? जवाबदार असेल तर आपण आतापर्यंत काय कारवाई केली??

6) बायोमेडिकल वेस्ट मुळे प्रदूषण होत आहे हे आपल्या निदर्शनात येत नाही का?? यावर आपण काय उपाययोजना केल्या?? कोरोना पसरण्यात याचाही अंतर्भाव आहे हे महानगरपालिका का पाहत नाही?? व यास जबाबदार अधिकाऱ्यांवर आपण का कारवाई करत नाही??. त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत नाही??

7) वरील नमूद केलेले पावणे पाच कोटी रुपये हे जनतेचे असून एक प्रकारे अधिकारीवर्ग जनतेलाच लुटत नाहीत का? यांच्या या बेजबाबदार वर्तनावर आपण का कारवाई करत नाही.

8) महानगरपालिका मूळ जलपर्णी वाढू नये याकरता ठोस पावले उचलत नाही?? फक्त जलपर्णी काढून पैसा, वेळ घालवणे हा उपाय आहे का?? वर्षानुवर्ष महानगरपालिका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला, ॲक्शन प्लान देत आहे परंतु त्याप्रमाणे काम का होत नाही?? याला आपल्या अपुरे नियोजन जबाबदार नाही का??? असल्यास अधिकारी वर्ग काय काम करतो तसेच आपण त्यावर काय उपाययोजना केल्या या जनतेसमोर मांडाव्यात.

9) वर्षानुवर्ष आपण ड्रेनेज नेटवर्क पूर्ण करत नसेल व नद्यांचे प्रदूषण होत असेल तसेच मानवी आरोग्य व जलसृष्टी वर परिणाम होत असेल तर आपल्या अधिकार्‍यांवर, संबंधित विभागावर आपण कायदेशीर कारवाई का करत नाही??

तसेच माजी खासदार गजानन बाबर यांनी या गोष्टींवर त्वरित कारवाई करावी व दोषींना कायदेशीर शासन करावे तसेच तात्काळ उपाय योजना कराव्यात अन्यथा आम्हाला याची दाद “हरित लवादाकडे” मागावी लागेल याची आपण नोंद घ्यावी. असेही या निवेदनात म्हटले आहे.

या सर्व प्रकणात झालेल्या खर्चाचा हिशोब माहिती अधिकारात गजानन बाबर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून घेतला असल्याचे दिसून येत आहे आणि त्याआधारे प्रश्नांची उत्तरे देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

17 hours ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

1 day ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

2 days ago