Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथील दुर्घटनाग्रस्त गरीब कुटुंबाला अर्थिक मदत करा … युवासेनेची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे दिनांक २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान मडके कुटुंबाचे राहते घर कोसळले घरामध्ये दुर्घटने वेळी दोन मुली व त्यांची आई घरात उपस्थित होते. स्थानिक रहिवासी पोलीस प्रशासन अग्निशामक दल रेस्क्यू टीम यांच्या सहकार्याने घर कोसळत असताना प्रथम एक मुलगी व आईला वाचविण्यात यश आले.अजून काही भाग कोसळल्याने घरात मातीच्या ढिगार्याखाली पौर्णिमा मडके अडकून राहीली तीन तासाच्या अथक प्रयत्नातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

परंतु मध्यमवर्गी असलेल्या मडके कुटुंबावर एक प्रकारे संकटच कोसळले हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे राहते घर क्षणातच नाहिसे झाले घरात पौर्णिमाचे वडील एकटेच कमवते शिपायाची नोकरी त्यातच उदरनिर्कुवाहासह कुटुंब सावरणे व नवीन घर बांधणे अवघड आहे तरी सदर कुटूंबाचा गांभीर्याने विचार करत मडके कुटुंबाला आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी महापालिकेकडून आर्थिक मदत करण्यात यावी याबाबचे निवेदन अति आयुक्त विकास ढाकणे साहेब यांना देण्यात आले .

Google Ad

यावेळी युवासेना शहरप्रमुख विश्वजीत बारणे, उपशहरप्रमुख युवासेना राजेंद्र तरस,शहर सन्मवयक युवासेना रूपेश कदम,चिंचवड युवा अधिकारी माऊली जगताप,युवती अधिकारी प्रतीक्षा घुले,अविनाश जाधव,मोसीन शेख पिंपरी युवासेना युवा अधिकारी नीलेश हाके यांच्यावतीने सर्व पदाधिकार्यांसह पीडित कुटुंबाची भेट घेऊन घटनास्थळी पाहणी करण्यात आली व महापालिकेकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!