महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ ऑक्टोबर) : अथक परिश्रमाची तयारी, कष्टात सातत्य आणि चिकाटी असेल, तर ‘कोणत्याही व्यवसायात यश संपादन करणे अवघड नाही. मुलांनी संकल्पना स्पष्ट करून त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळेच यशाचा आलेख वाढत जातो … असाच यशाचा आलेख उंचवणारा सुसंस्कृत पुण्याचा रौनक संचेती होय.
स्वत:च्या उमेदीने नवे काही करू पाहणाऱ्या युवकांच्या पाठीवर नेहमीच कौतुकाची थाप आवर्जून देणार काही अदृश्य हात असतात. त्याच अदृश्य हातांनी सुरुवातीच्या टप्प्यावर मिळणारे हे प्रोत्साहन आणि उमेदच त्यांना चांगल्या रीतीने यशाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकते.
ये अदृश्य हात म्हणजे अप्पा रेणूसे होय, अप्पांचे सहकारी रौनक रवींद्र संचेती या उमद्या, धडपड्या तरुणाने नव्याने अगरबत्तीचे उत्पादन सुरू केले. त्याने ११ प्रकारच्या नव्या अगरबत्ती बाजारात आणल्या आहेत. त्याला या व्यवसायात भरघोस यश मिळावे त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी म्हणून त्याच्या नवीन प्रोडक्शनचे लॉन्चिंग सिद्धिविनायक चरणी अर्पण करून केले.
यावेळी सिद्धीविनायक ट्रस्टचे विश्वस्त राजाराम देशमुख यांच्या हस्ते हे प्रोडक्ट लॉन्चिंग केले. या प्रसंगी अप्पा रेणूसे, रवींद्र संचेती, नेमीचंद सोळंकी, हितेश तन्ना, मधुकर कोंढरे आदी उपस्थित होते. यावेळी रौनकच्या या नव्या व्यावसायिक उपक्रमास आप्पा रेणुसे मित्र परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा ही देण्यात आल्या.