Google Ad
Editor Choice

प्रा.विष्णू शेळके यांची राष्ट्रवादी काँगेस अनुसुचित जमाती ( आदिवासी ) सेलच्या पिंपरी – चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ऑक्टोबर) : लेखक, कवी, शाहीर प्रा. विष्णू शेळके यांची राष्ट्रवादी काँगेस अनुसुचित जमाती (आदिवासी) सेलच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

यासंदर्भातील नियुक्ती पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी शहर कार्यकारणीच्या बैठकीत देण्यात दिले. यावेळी शहर महिला अध्यक्षा वैशालीताई काळभोर, प्रवक्ते फजलभाई शेख, मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय बोऱ्हाडे, लीगल सेल अध्यक्ष ॲड. गोरक्ष लोखंडे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सचिन आवटी, अर्बन सेल अध्यक्ष माधव पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदिप चिंचवडे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, सामाजिक न्याय्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरात लाखाहून अधिक लोकसंख्येने आदिवासी बांधव राहत असून, विष्णू शेळके हे आदिवासी समाजातील अभ्यासू व उच्चशिक्षित कार्यकर्ते आहेत. गेली 24 वर्ष अध्यापनाचे काम करीत असून, आता वकिलीचा अभ्यास करीत आहेत. आदिवासी समाजाच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेले एक प्रभावी वक्ता ही त्यांची जनसामान्यांतील प्रतिमा आहे.

शहरातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठवला असून, त्यासाठी मोर्चे, आंदोलने, उपोषणे या संविधनिक मार्गाचा ते अवलंब करीत असतात. शहराच्या सर्व उपनगरातील आदिवासीं बांधवांच्या सर्व जमातीचे एकीकरण हे त्यांच्या कार्यप्रणालीचे सूत्र आहे. महिला बचत गट महासंघ, वाद्य पथके, पारंपरिक लेझिम पथके यांचे ते संस्थापक असून, आदिवासी समाजाला आपल्या न्याय हक्कांची, कायद्याची जाणीव निर्माण व्हावी, आपल्या दैदिप्यमान इतिहासाचा, शौर्याच्या परंपरेचा अभिमान निर्माण व्हावा, याकरिता प्रबोधन व्हावे म्हणून त्यांनी आदिम प्रबोधन पथकाची स्थापना केली आहे. लेखक, कवी, शाहीर असल्याने स्वतः लिहिलेल्या पोवडे, प्रबोधनपर गीतांच्या माध्यमातून राज्यभर शाहिरी जलसे व प्रबोधनाचे कार्यक्रम घेत असतात.

शहरात सर्व स्तरातील कष्टकरी कामगार वर्गापासून ते उच्चपदस्थ अधिकारी वर्गातील आदिवासीं बांधवांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने त्यांनी शहरभर मजबूत संघटनात्मक बांधणीही केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

74 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!