Google Ad
Uncategorized

प्रेक्षकांची मने जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31ऑगस्ट  :- या सुखानो या’ म्हणत टेलिव्हिजनच्या पडद्यावर झळकलेली आणि आपल्या अभिनय कौशल्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकणारी हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं.

अवघ्या 38 व्या वर्षी जीवनप्रवास थांबवल्याने मराठी चित्रपटसृष्टीत आणि छोट्या पडद्यावर शोककळा पसरली आहे. गेल्या तीन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत असलेल्या प्रिया मराठेची तब्येत अखेरच्या काही महिन्यांत खालावत गेली. वैद्यकीय उपचार सुरू असतानाही तिच्या प्रकृतीने प्रतिसाद दिला नाही आणि अखेर मुंबईतील मीरा रोड येथील राहत्या घरीच 31 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने संपूर्ण मराठी कलाविश्व हळहळून गेले आहे.

Google Ad

प्रिया मराठेने ‘या सुखानो या’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेतील तिच्या भूमिकेनेच तिला लोकप्रियतेच्या झोतात आणले. त्यानंतर ‘चार दिवस सासुचे’, ‘तू तिथे मी’ यांसारख्या मालिकांमध्ये तिच्या दमदार भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. मराठीपुरता मर्यादित न राहता तिने हिंदी मालिकांमध्येही आपला ठसा उमटवला. ‘कसम से’ या मालिकेतून तिचा हिंदी प्रवास सुरू झाला. त्यानंतर ‘पवित्र रिश्ता’ Priya is now just a memory मधील वर्षाची भूमिका तिला घराघरात पोहोचवणारी ठरली.

त्यासोबतच ‘बडे अच्छे लगते हैं’ मध्ये ज्योती मल्होत्रा, तर ‘साथ निभाना साथिया’ मध्ये भवानी राठोड या महत्त्वाच्या भूमिका तिच्या अभिनय प्रवासात नोंदल्या गेल्या. कॉमेडी सर्कसच्या एका सीझनमध्ये तिने तिचा वेगळा पैलूही दाखवला.प्रिया मराठेने 24 एप्रिल 2012 रोजी तिचा मित्र व अभिनेता श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघेशी विवाह केला. दोघांनी एकत्र सुंदर आयुष्य सुरू केले असतानाच, तिच्यावर अचानक गंभीर आजाराचे संकट कोसळले. कॅन्सरशी दिलेला तिचा संघर्ष जिद्दीने सुरू राहिला, पण अखेर या लढाईत ती हरली. अजूनही अभिनयाचा मोठा प्रवास बाकी असतानाच प्रियाचा जीवनप्रवास थांबल्याने छोट्या पडद्यावर मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रेक्षकांच्या मनात तिच्या मालिकांतील असंख्य भूमिका कायम स्मरणात राहतील.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!