Google Ad
Editor Choice Sports

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ एप्रिल) : महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील(वय-२०) विरूद्ध मुंबई पूर्वचा विशाल बनकर यांच्यात आज अटीतटीची लढत झाली. यामध्ये पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकर याचा पराभव करत, २०२२ ची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. पृथ्वीराजने चार गुणांची पिछाडी भरून काढत पाच विरुद्ध चार असा विजय मिळवला.

या अगोदर पृथ्वीराजने पुणे शहरच्या हर्षद कोकाटेवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती, तर शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत विशालने वाशिमच्या सिकंदर शेखवर तेरा विरुद्ध दहा गुण फरकाने मात केली होती.

Google Ad

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित ६४ वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब मैदान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.

अंतिम क्षणी मी केलेली खेळी यशस्वी झाली –

“काहीही झाले तरी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकायचीच असा पण मी केला होता. आपण ही कुस्ती जिंकणारचं असा सुरूवातीपासूनच मला विश्वास होता. त्यासाठी मी पूर्वीपासून तयारीही केली होती. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेऊन शेवटी आक्रमक व्हायचे असे धोरण मी ठरवले होते. कुस्ती करत असताना मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली आणि अंतिम क्षणी मी केलेली खेळी यशस्वी झाली व गुणाधिक्यावर मी जिंकलो.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरल्यानंतर पृथ्वीराज पाटील याने दिली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!