Google Ad
Uncategorized

पिंपरीतील विद्यानिकेतन शाळेच्या मुख्याध्यापकांची बदली करावी : श्रीरंग शिंदे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ सप्टेंबर) : विद्यानिकेतन प्राथमिक शाळा सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये चालू आहे. परंतु या शाळेला एकच मुख्याध्यापक असल्याने संबंधित मुख्याध्यापक सकाळी किंवा दुपारी उपस्थित नसतात. या शाळेच्या मुलांच्या संख्येमध्ये फार मोठी घसरण झालेली आहे. विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व शिक्षण मंडळ माजी सभापती श्रीरंग शिंदे यांनी एका पत्रकारद्वारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

या शाळेचे मुख्याध्यापक पालकांबरोबर व्यवस्थित वागत नाहीत. बऱ्याच वेळा त्या शाळेत गैरहजर असतात. शाळेतील अनेक शिक्षकांच्या बाबतीत पालकांच्या तक्रारी आहेत. शाळेतील शिक्षक बऱ्याच वेळा मोबाईलवर बोलण्यात किंवा व्हाट्सअप पाहण्यात दंग असताना तर काही शिक्षक दुपारनंतर शाळेमध्ये हजर नसतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर झालेला आहे.

Google Ad

या शाळेच्या विद्यार्थ्यांची संख्या पूर्वी 800 होती. ती आता 200 ते 300 झालेली आहे. अनेक पालकांनी आपली मुले खाजगी शाळेत घातली आहेत. शिक्षणाचा दर्जा फार खालावलेला आहे. विद्यार्थीचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. या शाळेचे मुख्याध्यापक पालकांबरोबर बेजबाबदारपणे वागत आहेत.

26 जानेवारीला झेंडावंदनच्या दिवशी झेंडा उलटा लावलेला होता. यावेळी पालक व नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला होता. काही नागरिकांनी पोलिसात तक्रार देऊन शाळेवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या मुख्याध्यापकांची बदली न केल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा श्रीरंग शिंदे यांनी दिला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!