Google Ad
Editor Choice

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये, आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप यांनीही केले स्वागत … मराठीत भाषण करत जिंकली उपस्थितांची मनं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १४ जून) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार गिरीष बापट यांनी विमान तळावर स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देहूत आले त्यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकरशेठ जगताप, माजी आमदार बाळा भेगडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणाला मराठीत सुरुवात केली. श्री विठ्ठलाय नमः असा जयघोष करत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या असं म्हणत त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली.

सुरक्षेच्या कारणास्तव या सभेला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले होते. याशिवाय कडक तपासणी करूनच वारकऱ्यांना सभास्थळी सोडण्यात येत होते. मुख्य मंडपात आणि दोन उपमंडपात मिळून सुमारे दहा हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी होती. पुरुष वारकरी पेहरावात दिसत असून त्यांच्या डोक्यावर गांधी टोपी, भगवी टोपी आणि भगवे फेटे लावलेले दिसत होते.

Google Ad

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते देहूतील शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे देहूत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी संत तुकाराम महाराज देवस्थानाने केली होती. पंतप्रधानांचा सत्कार करण्यासाठी उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देऊन नितीन महाराज मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिकृती देण्यात आली.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणाआधी देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित करत, हा सोहळा आपल्यासाठी आनंदाचा आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी आले आहेत. त्याचे मी स्वागत करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

▶️तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले- मोदी

आज संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण करण्याचे मला सौभाग्य लाभले. ज्या शिळेवर तुकाराम महाराजांनी १३ दिवसांपर्यंत तपश्चर्य केलेली असेल, जी शिळा तुकाराम महाराजांचे वैराग्याची साक्षीदार झालेली आहे. मी ही शिळा म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा आधार असल्याचे मानतो. देहू येथील शिळामंदिर फक्त भक्तीच्या शक्तीचे केंद्र नसून त्यामळे भारताचे सांस्कृतिक भविष्य प्रशस्त होणार आहे. या पवित्र स्थानाचे पुन:निर्माण केल्यामुळे मंदिर समितीचे मी आभार व्यक्त करतो.▶️देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन – मोदी

देहूच्या या परिसरात भगवान पांडुरंग सापडतो. येथील प्रत्येकजण भक्तीने ओतप्रोत संताचं रुप आहे. याच करणामुळे मी देहूच्या सर्व नागरिकांना आदरपूर्वक नमन करतो. मागील काही महिन्यांपूर्वी मला पालखी मार्गावर दोन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य लागभले होते. ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक ठिकाणी ओव्या आणि अभंग म्हटले.

जे का रंजले गांजले त्यासा म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा,’ हा अभंग त्यांनी म्हटला.

 

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!