Google Ad
Uncategorized

पंतप्रधान मोदी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी करणार कठोर व्रत, 3 दिवस कांबळ घेऊन चौकीत झोपणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जानेवारी) : अयोध्येत रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यासाठी आजपासून अनुष्ठान सुरू करण्यात आले आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

यामुळे अयोध्येसह देशभरात उत्सवाचं वातावरण आहे. धार्मिक कार्यक्रमाच्या शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी हे चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत.

Google Ad

पंतप्रधान मोदी 22 जानेवारीला रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान मोदींना कठोर असं धार्मिक अनुष्ठान आणि नियम पाळावे लागणार आहेत. गोविंददेव महाराज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले शेवटच्या तीन दिवसात पंतप्रधान मोदी त्यांच्या चौकीवर फक्त कांबळ घेऊन झोपणार आहेत.

या तीन दिवसात आहार म्हणून फक्त फळांचे सेवन करतील. पंतप्रधान मोदींनीच विचारलं होतं की, त्यांना काय करावं लागणार आहे. कितीही कठीण असलं तरी त्यासाठी मी तयार आहे असंही ते म्हणाले होते. पंतप्रधान मोदींना विशेष मंत्रांचा जप करायचा असून त्याचीही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींकडून यावेळी दानही केले जाणार आहे. त्यासोबतच भेटवस्तू दिल्या जातील. त्याचे पूजन करण्यात येईल. प्राण प्रतिष्ठेसाठी प्रमुख पाहुणे अनिल मिश्रा असतील. त्यांनाही काही धार्मिक अनुष्ठान करावे लागणार आहेत. मंदिर उभारणीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे प्रतीक म्हणून जटायूची मूर्तीही तयार करण्यात आली आहे. त्या मूर्तींचे पूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!