*चांद्रयान मोहिमेमध्ये प्राईड स्कूलच्या विद्यार्थ्यांचे योगदान!
अत्यंत अभिमानाचा असा क्षण!!
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जुलै) : चिंतामणी ज्ञानपीठाच्या प्राइड इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेतलेल्या आदेश फलफले या माजी. विद्यार्थ्याने इस्रोच्या मिशन ‘चांद्रयान 3’ साठी योगदान दिले आहे. अवघ्या पुणेकरांसाठी ही अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे. चौथ्या वर्षाच्या अंतिम सत्रात इस्रोच्या इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टमच्या प्रयोगशाळेत आदेशनी योगदान दिलेले आहे. तिथे त्याने चांद्रयान 3 मॉड्यूलवर असलेल्या सेन्सर्सच्या चाचणीत भाग घेतला होता. थर्मल व्हॅक्यूम टेस्टिंग इ. मध्ये त्याने आपले योगदान दिलेले आहे. सध्या सॅटेलाइट डॉकिंगसाठी मॅग्नेटिक रोटेटिंग सिस्टीमवर काम करत असलेल्या इस्रोच्या आगामी मिशनमध्ये तो योगदान देत आहे.
एक वर्षापासून आदेश चाचणी आणि संशोधन आणि विकास उद्देशांसाठी इस्रो केंद्रांना भेट देत आहे. सध्या तो PixxelSpace साठी स्पेसक्राफ्ट थर्मल इंजिनियर म्हणून फायरफ्लाय सॅटेलाइट मिशनवर काम करत आहे. ही उपग्रहांची मालिका जून 2024 मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
आपल्या एका विद्यार्थ्याने देशाच्या संशोधन विकासामध्ये दिलेले महत्त्वपूर्ण योगदान पाहून निश्चितपणे त्याचा खूप अभिमान वाटतो, असे म्हणत चिंतामणी ज्ञानपीठ व प्राइड इंग्लिश स्कूलच्या सर्व गुरुजनांच्या वतीने आदेश तुझे खूप खूप अभिनंदन अशा शुभेच्छा अप्पा रेणूसे यांनी दिल्या.
चांद्रयान 3 चे वैशिष्ट्य इस्रोने 14 जुलै 2023 रोजी (Chandrayaan 3) चंद्रयान 3 मोहीम सुरू केली. दुपारी 2.35 वाजता मिशनचे प्रक्षेपण करण्यात आले. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग हे या मोहिमेचे ध्येय आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर चालवणे आणि चंद्रावर उपस्थित असलेल्या घटकांची माहिती गोळा करणे. हे वाहन तयार करण्यासाठी सुमारे 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या वाहनाचा लँडर चंद्राच्या त्या भागात म्हणजेच चंद्राच्या निर्जन भागांमध्ये जाईल आणि तेथे उपस्थित असलेल्या धातू आणि इतर घटकांची माहिती गोळा करेल.